MLA Bachchu Kadu | रवी राणा आणि बच्चू कडू यांनी समजुतीने घेतले पाहिजे – आ. श्रीकांत भारतीय

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Bachchu Kadu | मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या घरात गृहयुद्ध करुन भाजपसोबत (BJP) वेगळी चूल मांडली खरी, पण आता त्यांच्याच घरात देखील गृहयुद्ध सुरु झाले आहे. अमरावतीचे त्यांचे दोनही समर्थक अपक्ष आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांच्यात वाद पेटला आहे. बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी तर रवी राणांना माफी मागण्यासाठी 1 नोव्हेंबरची मुदत दिली आहे.

त्यांच्या या वादावर आता आमदार श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiya) यांनी दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. दोनही नेते जनतेतून निवडून आलेले आहेत. महाराष्ट्रातील जनता ही राजकीय संस्कृती समजणारी जनता आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी समजदारीने वागले पाहीजे, अशी जनतेची आणि आमची अपेक्षा आहे. ते करत असलेल्या शब्दांचा वापर हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग असूच शकत नाही. त्यामुळे राजकीय (Maharashtra Politics) क्षेत्रातला नेता कोणीही असू द्या, मग ते बच्चू कडू (Bacchu Kadu) असो अथवा रवी राणा असोत, आपण बोलताना आपल्याला निवडून दिले ती आपल्या महाराष्ट्रातील सुसंस्कृत जनता आहे. त्यामुळे त्यांना अपेक्षीत शब्दांचाच वापर आपण केला पाहिजे, असेही आमदार श्रीकांत भारतीय म्हणाले.

अपक्ष आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांचे वाद अमरावती जिल्ह्याला माहीत आहेत.
एकमेकांवर आरोप करणे, एकेरी उल्लेख करणे हे दोघांचे नित्याचे काम आहे.
रवी राणा यांनी बच्चू कडूंवर गुवाहाटीला जाऊन 50 कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता.
त्यावर त्यांनी त्यांना 1 नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आव्हान केले आहे.
अन्यथा आपण वेगळा विचार करणार असल्याचे त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले.
आपल्यासोबत आठ ते दहा आमदारांचा गट आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून
रवी राणा यांना माझी माफी मागायला लावावी, असे कडू म्हणाले होते.

Web Title :- MLA Bachchu Kadu | Ravi Rana and Bachu Kadu should understand – Shrikant Bhartiya

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gulshan Grover | बॉलिवूड अभिनेते माझाच लूक कॉपी करतात; अभिनेते गुलशन ग्रोव्हर यांच्या वक्तव्याची बॉलिवूडमध्ये चर्चा

BCCI | BCCI चा मोठा निर्णय! आता पुरुष आणि महिला क्रिकेटर्सना मिळणार समान मानधन