home page top 1

पक्ष बदलू नेत्यांना जोड्याने मारले पाहिजे : आमदार बच्चू कडू

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – दहा – दहा वर्षे मंत्रिपद भेटूनसुद्धा पुन्हा आमदार झालं पाहिजे. यासाठी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना मतदारांनी जोड्यांनी मारलं पाहिजे. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. असे रोखठोक मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केलं आहे. अमरावती येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

बच्चू कडू म्हणाले की, नैतिकता, प्रामाणिकपणा, विचारधारा नेत्यांकडे असणे गरजेचे आहे. मी गेली १५ वर्षे एक विचार घेऊन उभा आहे. अशी नालायक लोक ही हिजड्याची औलाद आहेत. मतदारांनी अशा लोकांना मतदानातून वठणीवर आणलं पाहिजे. अशी लालसा बरोबर नाही. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस पक्षातील अनेक नेते आपल्या पक्षाला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांसह आघाडीतील ५ दिग्गज नेते ८ ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी काल परवाच भाजपमध्ये प्रवेश बंद असे म्हंटले होते. पण त्यानंतर पुन्हा घुमजाव करत भाजपमध्ये प्रवेश चालूच असणार आहे. असे त्यांनी सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी रोखठोक मत व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी काढलेली जनादेश यात्रा म्हणजे पैशांची उधळपट्टी आहे असे म्हणत त्यांनी महाजानदेश यात्रेवर निशाणा साधला.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like