‘मी तुझा बाप आहे, बुक्कीत दात पाडीन’ : पोलीस अधिकाऱ्याच्या उद्दामपणावर आमदार भालकेंचा रौद्रावतार

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभेत आक्रमक म्हणून त्यांची ओळख आहे. मंदिर परिसरातील अतिक्रमण हलवताना एका वृद्ध महिला विक्रेत्याला पोलिसांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर भारत भालके मंदिर परिसरात गेले होते. सुरुवातील अगदी शांततेच चर्चा सुरु होती. परंतु मंदिर सुरक्षेतील पोलीस अधिकारी उद्दाम उत्तरे देत आहे हे पाहून भालके यांचाही पार चढला. यानंतर भालकेंनी थेट त्या पोलीस अधिकाऱ्यास मी तुझा बाप आहे, बुक्कीत दात पाडीन ही भाषा वापरली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वास साळोखे असं या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
जम्मू येथील पुलवामा हल्ल्यानंतर पंढरपूर मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी पोलिसांनी मोहिम हाती घेतली होती. ही मोहिम सुरु असताना पोलिसांनी एका महिला विक्रेत्याला मारहाण केली. त्यानंतर हे विक्रेते संतप्त झाले. यानंतर त्यांनी थेट आमदार भालके यांना हा प्रकार सांगितला. या तक्रारीनंतर भालके हे तिथे दाखल झाले.  सुरुवातीला शांतपणे सुरु असलेल्या चर्चेत पोलीस अधिकारी विश्वास साळोखे यांनी महिला विक्रेत्याचा अरेतुरे बोलण्यास सुरुवात केल्यावर भालके भडकले. यावेळी साळोखे यांनी डोक्यावर टोपी घातली नव्हती. त्यात त्याच्या शर्टाची काही बटणं उघडी होती अशा अवस्थेतच तो अधिकारी भालके यांच्याशी बोलू लागला.  भालके यांनी त्यांना तुझी टोपी कुठे आहे असे विचारले यावर या अधिकाऱ्याने उद्दामपणास सुरुवात केली. यानंतर भालके यांनी थेट ‘मी तुझा बाप आहे, बुक्कीत दात पाडीन’अशा भाषेत बोलण्यास सुरुवात केल्याने परिस्थिती चिघळली.
या प्रकारानंतर भालके यांच्याविरोधात 7 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे त्रास झालेले व्यापारी लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचे पत्र निवडणूक आयोगाला देणार आहेत अशी माहितीही समोर आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us