भारत भालके : ‘लाल माती ते राजकीय आखाडा’

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – ३० ऑक्टोबर रोजी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत तुकाराम भालके यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यशस्वी उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र त्यांना आठ दिवसांपूर्वी पुन्हा त्रास जाणवू लागला. उपचारासाठी रुबीमध्ये दाखल केले होते. त्यापूर्वी सायंकाळी देशाचे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी रुबी हॉस्पिटलमध्ये जाऊन ते तरी डॉक्टरांकडे आमदार भारत भालके यांच्या प्रकृतीविषयी चौकशी केली होती. गुरुवारी (ता. २६) त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. रक्तदाब आणि मधुमेह याचा त्रास वाढल्याने शुक्रवारी दिवसभर त्यांची प्रकृती चिंताजनक होती. दरम्यान, रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. आमदार भारत भालके यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात पत्नी, तीन विवाहित मुली आणि एक मुलगा आहे. आमदार भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

आमदार भारत भालके यांची राजकीय कारकीर्द
आमदार भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. त्यांनी आपल्या जनसंपर्काच्या बळावरच विधीमंडळाच्या सदस्यत्वाची म्हणजेच आमदारकीची हॅटट्रिक मारली. यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी तालुक्याच्या राजकारणात १९९२ मध्ये सक्रिय सहभाग घेतला. ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही निवडून आले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत निवडणुकांना सामोरं जाणार असल्याने पंढरपूरच्या जागेवरुन तणातणी होण्याची शक्यता कमीच होती. दुसरीकडे भाजप-शिवसेनेचा तोपर्यंत युतीचा निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे युती झाल्यास शिवसेनेकडून माढा ऐवजी पंढरपूरची जागा भाजपला सुटणार का, या द्विधा मनस्थितीत आमदार भारत भालके होते. युतीची घोषणा तोपर्यंत झाली नसल्याने भाजपच्या पक्षनेतृत्वाने भालकेंना होल्डवर ठेवलं होतं, त्यामुळे भालकेंची धाकधूक वाढली होती. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पुढे ते २००२ मध्ये याच कारखान्याचे अध्यक्षही झाले. तेव्हापासून आजपर्यंत अध्यक्षपद राखत त्यांचंच या कारखान्यावर वर्चस्व राहिलं. भारत भालके सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले. मात्र या तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. २००९ मध्ये त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला आणि ते राजकारणातील जायंट किलर ठरले.२०१९ मध्ये त्यांनी माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा पराभव केला. विशेष म्हणजे २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खरंतर त्यावेळी ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र ऐनवेळी भारत भालकेंनी ‘डब्ल्यू’ टर्न घेत कमळ हाती घेता-घेता अचानक राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ हाती बांधलं होतं. २०१९ मध्ये भारत भालके यांनी काँग्रेसला अनौपचारिक रामराम ठोकल्यावरही भाजपकडून त्यांना होल्डवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, विधानसभेच्या तोंडावर सावध निर्णय घेत भालके यांनी भाजपऐवजी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेण्याचं ठरवलं.

जाणून घेऊ भारत भालके यांच्याविषयी
– पंढरपूर- मंगळवेढ्यातून काँग्रेस आमदार
– काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतीला दांडी मारली होती
– काँग्रेसच्या अनेक बैठकांना पाठ फिरवली
– भाजप प्रवेशासाठी मुंबईत तळ ठोकून होते
– भाजपा प्रवेशाला भाजपमधील परिचारक गटाने मोठा विरोध केला .

कोल्हापूरच्या लाल मातीत मिळाले राजकीय धडे
पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे १९६० झाली त्यांचा शेतकरी कुटुंबात जन्म झाला. त्यांचे चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण सरकोली येथील प्राथमिक शाळेत झाले. द. ह. कवठेकर प्रशालेत त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. शिक्षणाबरोबरच पैलवानकी करण्यासाठी कोल्हापूर येथे गेले. कोल्हापूरच्या गंगावेस तालमीत पैलवानकीचा सराव सुरू केला. तिथेच त्यांना राजकारण आणि समाजकारण याची आवड निर्माण झाली. यशवंतराव चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विचारांचा त्यांचा मोठा पगडा होता. कोल्हापूरच्या तालमीतून आल्यानंतर त्यांनी राजकारण आणि समाजकारण सुरुवात केली. माजी मंत्री काही प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पंढरपूर तालुक्यात जनसेवा संघटनेचे काम सुरू केले. पुढे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पद मिळवून देण्यात प्रतापसिंह यांचा मोठा वाटा होता.

भारत भालके यांच्या निवडणुकांचा इतिहास
२००४ : शिवसेना – पराभूत
२००९ : रिडालोस – विजयी
२०१४ : काँग्रेस- विजयी
२०१९ : राष्ट्रवादी – विजयी
हॅटट्रिक आमदार म्हणून आमदार भारत भालके यांची ओळख
२००९ मध्ये पंढरपूर विधानसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करुन जायंट किलर ठरले.
२०१९ मध्ये माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा पराभव केला. २००२ पासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून आजतागायत काम पाहत होते
१९९२ मध्ये ते तालुक्याच्या राजकारणात सक्रीय झाले. विठ्ठल कारखान्याचे संचालक म्हणून सुरुवात केली.

You might also like