MLA Bhaskar Jadhav । ‘मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या, आजचा दिवस लोकशाहीला काळीमा फासणारा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन (Rainy convention) आजपासून (सोमवार) सुरु झालं आहे. आजच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) ठरावावरून सभागृहात गोंधळ निर्माण झाला होता. विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘विरोधी पक्षाचे सदस्य आत घुसले आणि त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. भास्कर जाधव म्हणून नव्हे, तर पीठासीन अधिकारी म्हणून हा खूप मोठा अपमान आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर असं कधी घडलं नाही. माझ्यासाठी आजचा काळा दिवस असल्याचं जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले. mla bhaskar jadhav slams bjp mla over chaos assembly monsoon session

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

काय म्हणाले भास्कर जाधव ?
भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीच घडलं नाही.
सभागृहात ताणतणाव होत असतात.
त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधक बसून तोडगा काढत असतात.
परंतु यावेळी विरोधकांनी मर्यादा ओलांडली. विरोधकांचा गोंधळ सुरू होता.
त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या.
हे आमदार घुसले तर घुसले ते गावगुंडाप्रमाणे अंगावर तुटून पडले.
त्यावेळी मीही त्यांना म्हटलं की तुम्ही 60-70 जण आलात तरी मी एकटा इथं उभा आहे.
तुमच्या सदस्यांना आवरा, आपण बसून चर्चा करू असं विरोधी पक्षनेत्यांना मी सांगितलं, पण ते देखील ऐकायला तयार नव्हते.

पुढे जाधव म्हणाले, ‘मी शिवीगाळ केली अशी खोटी माहिती माध्यमांना दिली गेलीय,
पण मी जर एकही असंसदीय शब्द बोललो अथवा शिवी दिली असेल तर मी स्वत:हून शिक्षा घ्यायला तयार आहे.
तुम्हाला जी शिक्षा होईल ती मीही घेईन. मी आक्रमक आहे.
परंतु, कधीच असंसदीय शब्दप्रयोग केलेला नाही.
आजचा दिवस माझ्या आयुष्यातील काळा दिवस आहे.
ही घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी आहे.
त्यामुळे म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावता कामा नये, म्हणूनच संसदीय कार्यमंत्र्यांनी त्यावर पावलं उचलावीत, असं आदेश देखील भास्कर जाधव यांनी दिलेत.

12 भाजपा आमदारांचं निलंबन –
दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन दरम्यान आज सभागृहात गदारोळ झाला होता. त्यावेळी, गोंधळ घालणाऱ्या भाजपाच्या 12 आमदारांवर (12 BJP MLAs) एक वर्षाच्या निलंबनाच्या कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आमदार आशिष शेलार (Ashish Shelar), गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. ही कारवाई तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी केली आहे.

Web Titel : mla bhaskar jadhav slams bjp mla over chaos assembly monsoon session

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai High Court | बलात्कारामुळे गर्भवती राहिलेल्या तरुणीला दिलासा ! HC ची गर्भपातास परवानगी, विधी सेवा प्राधिकरणाने केली प्रक्रीया पुर्ण

BJP MLA Atul Bhatkhalkar । ‘तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचं नाव डांबरानं लिहिलं जाईल’