मुख्यमंत्रांच्या शेजारी उभे राहण्याचा मोह अन् महोदय आपटले ; व्हिडिओ व्हायरल

हिंगोली :  पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री फडणवीस हिंगोलीत शेतकरी आणि बचतगट मेळाव्यासाठी आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्याच्या शेजारी जाऊन उभे राहण्यासाठी लगबग करणारे आमदार तानाजी मुटकुळे पाय घसरून पडण्याची घटना घडली.  यावेळी स्टेजवर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, पालकमंत्री दिलीप कांबळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांच्या सभेपेक्षा आमदार महोदयांच्या या पडण्याचीच चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला-ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हिंगोलीमध्ये शेतकरी आणि बचत गट मेळाव्यासाठी आले होते. सभास्थानी मुख्यमंत्र्याचे आगमन होताच मुख्यमंत्री, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे आणि पालकमंत्री हे जनतेला हात वर करून हस्तांदोलन करत होते. मात्र याचवेळी मुख्यमंत्र्याच्या शेजारी जाऊन उभे राहण्यासाठी अत्यंत लगबगीने जाणारे आमदार तानाजी मुटकुळे पाय घसरून पडले. मुटकुळेंना पंकजा मुंडेंनी आधार देण्याचा प्रयत्न केला तरीही आमदार मुटकुळे स्टेजवरून खाली पडले. त्यांनतर स्वतःला सावरत आमदार पुन्हा स्टेजवर गेले.