MLA Dada Bhuse | उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वीच दादा भुसेंचा इशारा, म्हणाले-‘जास्तीचं खोटं बोलले तर…’

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – मालेगावात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा (Uddhav Thackeray Rally in Malegaon) होत आहे. विशेष म्हणजे मालेगावचे आमदार दादा भुसे (MLA Dada Bhuse) हे देखील शिंदे गटात आहेत. त्यामुळे या सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र सभेपूर्वीच राजकीय वातावरण (Maharashtra Politics News) तापले आहे. उद्धव ठाकरे जर जास्तीचं खोटं बोलले तर, उत्तर सभा आम्ही सुद्धा घेऊ असा इशारा दादा भुसे (MLA Dada Bhuse) यांनी दिला आहे.

 

दादा भुसे यांनी आज होणाऱ्या सभेवरुन ठाकरे गटाला (Thackeray Group) टोला लगावला आहे. दादा भुसे म्हणाले, मालेगावच्या सभेसाठी अनेक पक्ष बदलून ठाकरे गटात आलेले काही लोक आहेत. काँग्रेस (Congress) , राष्ट्रवादी (NCP) आणि महाराष्ट्रातून गर्दी गोळा केली जात आहे. याचा अर्थ नेत्याचा मालेगावच्या जनतेवर विश्वास नाही, असा टोला भुसे (MLA Dada Bhuse) यांनी लगावला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

जास्तीचं खोटं बोलले तर…
दादा भुसे पुढे म्हणाले, लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. राजकारणात मत मांडत असताना काही पातळीपर्य़ंत टीका करण्याचा अधिकार आहे. परंतु संजय राऊत (Sanjay Raut) खोट बोलत जनतेची दिशाभूल करत आहेत. मालेगावच्या जनतेला आम्ही काय आहोत हे माहिती आहे. ते जर जास्तीचं खोटं बोलले, तर उत्तर सभा आम्ही सुद्धा घेऊ, असा इशारा दादा भुसे यांनी ठाकरे गटाला दिला आहे.

 

बोलणाऱ्यांपेक्षा जनतेला काय वाटतं, हे महत्त्वाचं आहे. जनता आता या गोष्टीला कंटाळून गेली आहे.
जनता याला बिलकुल थारा देत नाही. विकास, जनतेची सुख दु:ख या गोष्टी महत्वाच्या आहेत.
केवळ दोन दिवसांसाठी गोष्टी करुन चालत नाही. हजारो लाखो शिवसैनिकांनी कष्ट घेतले आहे.
झोपडीतील जनतेची सेवा शिवसैनिकांनी केली आहे. त्यांच्या जिवावर शिवसेना (Shivsena) उभी आहे.
नेत्याच्या बाजूला चमचेगिरी करुन शिवसेना उभी राहत नाही, असा टोला दादा भुसे यांनी लगावला.

 

Web Title :- MLA Dada Bhuse | minister dada bhuse on nashik malegaon uddhav thackeray sabha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | वानवडी गावात टोळक्याचा धुडगूस; वाहनांवर दगडफेक करुन केली नासधुस

Dhule Accident News | अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत

Uddhav Thackeray Rally in Malegaon | उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी एकनाथ शिंदेचा धक्का, 3 माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश