‘चांगला पाऊस पडू दे’, आमदार दत्‍तात्रय भरणेंचे विठ्ठलवाडीतील विठ्ठलाला ‘साकडे’ !

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – राज्यात सर्वदुर पाऊस पडत असुन आनेक ठीकाणी नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. परंतु इंदापूर तालुका अद्याप मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत असुन आगामी काळात इंदापूर तालुक्यात मेघ गर्जनेसह धो.. धो.. पाऊस पडु दे व इंदापूर तालुक्यातील माझा सर्वसामाण्य शेतकरी सुखी होऊ दे अशी प्रार्थना इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील प्रति पंढरपूर समजल्या जाणार्‍या विठ्ठलवाडी येथिल विठ्ठल- रूक्मीनी मंदीरातील विठ्ठलाचे दर्शन घेवून विठ्ठल चरणी प्रार्थना केली.

संपुर्ण देश विदेशातुन लाखो, करोडो वारकरी भाविक भक्त व सर्वसामान्यांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपुरचे विठुराया यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पालखीसोबत पाई चालत पंढरपुरात दाखल झाले आहेत. तर इंदापूर तालुक्यातील प्रति पंढरपुर असलेल्या विठ्ठलवाडी येथील विठ्ठल -रूक्मिनी मंदीरातही एकादशी निमित्त भावीक भक्तांची मोठी गर्दी उसळली होती.यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनीही विठ्ठलवाडी येथिल विठ्ठल-रूक्मीनीचे दर्शन घेतले. व विठुरायाच्या चरणी लीन होऊन धो धो पाऊस पडून जगाचा पोशिंदा माझा शेतकरी बांधव सुखी समाधानी होऊन या राज्यातील दुष्काळी परिस्थिती जाऊ दे अशा प्रकारची प्रार्थना केली.

यावेळी मंदीर समितीच्या वतीने आमदार दत्तात्रय भरणे यांचा समितीचे अध्यक्ष श्री हरीदास माने, सचिव मोहन काळे यांनी श्रीफळ, हार, फेटा देऊन सत्कार केला. यावेळी आमदार भरणे यांनी मंदीर परीसराची पाहणी करून विश्वशांतीचा प्रचार करत असलेल्या प्रजापिता ब्रहमकुमारी संस्थेच्या अनुयायांशी चर्चा केली. यावेळी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अंकुश काळे, कळसचे सरपंच गणेश सांगळे यांच्यासह विठ्ठलवाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.