
MLA Disqualification Case | आमदार अपात्रता प्रकरण ! नवरात्रीत पहिली सुनावणी, दिवाळीनंतर उलट तपासणी; विधानसभा अध्यक्षांकडून आमदार अपात्रतेचं वेळापत्रक तयार?
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आमदारांच्या अपात्रतेबाबत (MLA Disqualification Case) निर्देश देताना पुढच्या दोन सुनावणीपूर्वी नेमकी काय कारवाई केली याची माहिती विधानसभा अध्यक्षांनी (Assembly Speaker) द्यावी. अशा पद्धतीने अनिश्चित काळ काम करु शकत नाही, किती वेळ काम करणार याचे टाईम टेबल अध्यक्षांनी द्यावे असे निर्देश सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिले होते. यानुसार विधानसभा अध्यक्षांनी टाईम टेबल तयार केले असून नवरात्रीमध्ये पहिली सुनावणी होणार आहे. तर दिवाळीनंतर उलट तपासणी होणार आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. (MLA Disqualification Case)
शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Group ) आणि ठाकरे गट (Thackeray Group) या पक्षातील विधनसभा अध्यक्षांकडून सुनावणीचे पुढील वेळापत्रक ईमेल च्या माध्यमातून पाठवण्यात आले आहे. अध्यक्षांकडून मिळालेल्या वेळापत्रकानुसार दोन्ही गटांचे आमदार आणि बाजू मांडणारे वकील हे आता पुढील रणनीती ठरवणार आहेत. 25 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाने सर्व यांचिकांवर एकत्रीत सुनावणी घेण्याची मागणी केली होती. तर शिंदे गटाने यावर आक्षेप घेऊन या सर्व याचिकांवर स्वतंत्र पुरावे द्यायचे असल्याचे सांगून वेगवेगळी सुनावणी घेण्याची मागणी केली होती. या सर्व गोष्टींचा विचार करुन विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीचे वेळापत्रक निश्चित केले आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांना आज सकाळी आमदार अपात्रता प्रकरणातील सुनावणीच्या वेळापत्रकाची प्रत ईमेल द्वारे पाठवली आहे.
आमदार अपात्रतेच्या (MLA Disqualification Case) सुनावणीचे वेळापत्रक
- 13 ऑक्टोबर रोजी सर्व याचिका एकत्र करायच्या की नाही यावर सुनावणी
- 13 ते 20 ऑक्टोबर दरम्यान दोन्ही गटांनी एकमेकांना दिलेली कागदपत्रांची विधिमंडळात़ून तपासणी केली जाणार
- 20 ऑक्टोबर रोजी सर्व याचिका एकत्रित करायच्या की नाही यावर निकाल दिला देणार
- 20 ऑक्टोबरला काही अधिकची कागदपत्रे एखाद्या गटाला सादर करायची असतील तर त्यासाठी संधी दिली जाणार
- 27 ऑक्टोबरला दोन्ही गट आपलं म्हणणं मांडणार
- 6 नोव्हेंबरपर्यंत दोन्ही गट आपली बाजू मुद्देसूद मांडतील. त्यानंतर दावे आणि प्रतिदावे करतील
- 10 नोव्हेंबरला दोन्ही गटांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सुनावणी पार पडणार
- 20 नोव्हेंबरला दोन्ही गटांच्या साक्षीदारांची यादी सादर केली जाणार
- 23 नोव्हेंबरला साक्षीदारांची उलट साक्ष घेतली जाणार
- सर्व पुरावे तपासल्यानंतर पुढील दोन आठवड्यात अंतिम सुनावणी पार पडणार
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
BJP leader Shahnawaz Hussain | भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांना हृदयविकाराचा तीव्र झटका