हादगांव बु. सोसायटीच्या वतीने आमदार दुर्राणी यांचा सत्कार

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन –   महाराष्ट्र शासनाने आमदार बाबाजाणी दुर्राणी यांचे परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पद कायम ठेवल्याबद्दल पाथरी येथे सोमवारी हादगांव बु.विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने आ.बाबाजाणी दुर्राणी यांचा सत्कार करण्यात आला.

भाजप सरकारने आ.बाबाजाणी दुर्राणी यांचा पाथरी विविध कार्यकारी संस्थेशी संबंध नसतांनाही चुकीच्या कारणांने आ.दुर्राणी यांचे परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पद रद्द केले होते.त्यानंतर आ.दुर्राणी यांनी या शासन आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात दाद मागीतली होती. उच्च न्यायालयाने मंत्रालयातील सहकार विभागास यासंदर्भात पुनरिक्षण करण्याचे आदेश दिले होते.

यानंतर शासनाच्या सहकार विभागाच्या वतीने सुनावणी घेण्यात आली यादरम्यान सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आमदार बाबाजाणी दुर्राणी यांचे परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पद हे अपात्र ठरवणारा बेकायदेशीर आदेश रद्द करून आ.बाबाजाणी दुर्राणी यांचे परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पद कायम ठेवले.याबद्दल पाथरी येथे सोमवारी हादगांव बु.विविव कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने चेअरमन बाबासाहेब नखाते यांनी आमदार बाबाजाणी दुर्राणी यांचा सत्कार केला.या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते, महावीर गोंगे,सुनील नखाते, राजू नखाते, मुंजा गायकवाड यांची उपस्थिती होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like