MLA Eknath Khadse | ‘जे गोपीनाथ मुंडेंसोबत घडलं तेच पंकजा मुंडेंसोबत घडतंय’, एकनाथ खडसेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

मलकापूर/बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) नाराज असल्याची चर्चा राजकीय (Maharashtra Politics News) वर्तुळात सुरु आहे. महाराष्ट्रातील काही नेत्यांकडून त्यांना जाणीवपूर्वक डावललं जात असल्याचा राग कार्यकर्त्यांच्या मनात आहे. मात्र पंकजा मुंडे यांनी अनेकवेळा यावर स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे (NCP) आमदार एकनाथ खडसे (MLA Eknath Khadse) यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप केले आहेत. तसेच जे गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्यासोबत झाले तेच पंकजा मुंडे यांच्यासोबत घडतंय असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे (MLA Eknath Khadse) यांनी केला.

अलीकडेच पंकजा मुंडे यांनी नाशिक येथे ‘आपण कोणासमोर झुकणार नाही’, असं विधान केले होते. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या. यातच शुक्रवारी सकाळी एकनाथ खडसे (MLA Eknath Khadse) यांनी गौप्यस्फोट केला आहे. ते मलकापूर येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

एकनाथ खडसे म्हणाले, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांना भाजपने प्रचंड त्रास दिला.
तेच आता पंकजा मुंडे यांच्याबाबतीत घडतंय, असे खडसे म्हणाले. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीत घडलेली घटना सांगितली.
ते म्हणाले, स्वर्गीय भाजप नेते गोपीनाथ मुंडे हयात असताना, त्यांना भाजपने किती त्रास दिला, हे मला माहिती आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात (Union Cabinet) स्थान देण्यासाठी त्यांना पहाटे चार वाजेपर्यंत वाट पाहावी लागली.
त्यावेळी मी स्वत: त्यांच्यासोबत हजर होतो. मधल्या काळात गोपीनाथ मुंडे यांची इतकी छळवणूक झाली की,
त्यांच्या मनात पक्ष सोडण्याचा विचार येत होता. पक्ष सोडून द्यावा अशी स्थिती निर्माण झाली होती.
तोच प्रकार आता पंकजा मुंडेंबरोबर सुरु आहे.

Web Title :-   MLA Eknath Khadse | ncp eknath khadse on gopinath munde disregard in bjp same happening with pankaja munde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune PMC – Mahavitaran – MahaPreit | महापालिका आणि महाप्रीतच्या व्यवहारात मोठी आर्थिक अनियमीतता ! वीज पुरवठा दरात महापालिकेची फसवणूक झाल्याचा संशय

Belly Fat | पोटाची चरबी कमी करायची असेल तर करू नका ‘ही’ गोष्ट; जाणून घ्या

Pune Crime News | 50 हजारांवर अडीच लाख परत केल्यानंतरही 55 हजारांची मागणी करुन धमकाविणार्‍या सावकारावर गुन्हा दाखल, चंदननगर पोलीस ठाण्यात FIR

Maharashtra Politics News | निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवारांनी प्रयत्न केले, शिंदे गटाच्या नेत्या खळबळजनक गौप्यस्फोट