MLA Gopichand Padalkar | ‘बारामतीकरांनो, पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन –  भाजपचे (BJP) विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) हे आज (शनिवारी) बारामती दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी बारामतीचा (Baramati) बालेकिल्ला असणाऱ्या पवार घराण्यांवरच निशाणा साधला आहे. त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीका केली. बारामतीच्या जनतेने पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे, असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी केले आहे. पवारांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकार फुले- शाहू-आंबेडकर यांच्या खऱ्या वारसदारांच्या संविधानिक हक्कांवर गदा आणण्याचे आणि त्यांचा गळा घोटण्याचे महापाप करत असल्याचं देखील गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) आहे. त्यावेळी पडळकर हे माध्यमांशी बोलत होते. (Baramatikars, be free from the slavery of Pawar family, MLA Gopichand Padalkar)

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आज बारामतीच्या वेगवेगळ्या ठिकाणी वंजारी, तेली, शिंपी, माळी, रामोशी समाजाच्या घोंगड्या बैठका घेतल्या.
यावेळी पडळकर (Gopichand Padalkar) यांनी बारामतीच्या जनतेला पवारांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचे आवाहन देखील केले आहे.
पडळकर यांनी पवारांच्या बालेकिल्ल्यातूनच त्यांच्यावर तोफ डागल्याने आता या विधानावरून राष्ट्रवादी पक्षाचे नेते काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मधील काळात पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले होते.
अजित पवार (Ajit Pawar) यांना मागासवर्गीय नोकरी पदोन्नती आरक्षण उपसमितीचे प्रमुख करणे अर्थात मेंढरांनी लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करावी, असं होईल, अशा शब्दात पडळकर (Gopichand Padalkar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला होता.

या दरम्यान, आजच्या गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या विधानावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पवार हे त्यावेळी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. तुम्ही मला कोणाबद्दल विचारताय? बारामतीकरांनी ज्याचं डिपॉझिट जप्त केलं.
त्याच्याविषयी काय बोलायचं, अशी खोचक टिप्पणी देखील अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे.

Web Title : MLA Gopichand Padalkar | baramati people should get free from pawar family slavery says bjp gopichand padalkar

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

BJP Kirit Somaiya | आमदार प्रताप सरनाईक बेपत्ता असल्याची किरीट सोमय्यांची पोलिसात तक्रार