MLA Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली, टीका करताना शरद पवारांचा एकेरी उल्लेख (व्हिडिओ)

'माकड' म्हणत पडळकरांनी रोहित पवारांची उडवली खिल्ली

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) हे रविवारी रात्री उशिरा सोलापुरात आले होते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे धनगर समाजाच्या (Dhangar Community) वतीने गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांचा छोटीखाली सत्काराचा कार्य़क्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना पडळकर यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांचा (NCP Chief Sharad Pawar) एकेरी उल्लेख करत सडकून टीका केली. रोहित पवारांबाबत (NCP MLA Rohit Pawar) उल्लेख करताना ‘माकड’ म्हणत खिल्ली उडवली.

गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) म्हणाले, गेल्यावर्षी 31 मे रोजी शरद पवारांनी चौंडीत जाऊन अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Holkar) यांची जयंती साजरी केली. यंदा शरद पवार आले नाहीत. 4 वेळा मुख्यमंत्री होते, 12 वर्षे केंद्रात मंत्री होते. 1999 पासून राज्यात त्यांचे सरकार होते. एकदाही आले नव्हते. गेल्यावर्षी चौंडी त्यांना ताब्यात घ्यायचे होते. मात्र हा प्रयत्न आम्ही हाणून पाडला. परिवर्तनाचे केंद्र जागरुक ठेवले पाहिजे असं सांगत पडळकरांनी एकेरी भाषेत पवारांवर शाब्दिक हल्लाबोल केला.

जेजुरी संस्थानाबाबत बोलताना पडळकर यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं, जेजुरी देवस्थानामध्ये अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवला. जेजुरी संस्थानने हा पुतळा बसवला. हे संस्थान होळकरांचे आहे. पवारांचा या संस्थानाशी काहीही संबंध नाही. होळकरांनी जेजुरी मंदिराचा जीर्णोद्धार केला, ही होळकरांची जहागिरी आहे. एका वृत्तपत्रात अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे पाहणी करताना शरद पवारांचा फोटो पाहिला. माझ्या डोक्यात विचार आला काहीतरी गेम आहे. त्यानंतर 15 दिवसांतच शरद पवारांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणार, त्यांचा काय संबंध, आम्ही काहीतरी करतोय हे पवारांना दाखवायचे होते. पण त्यांचा हा प्रकार आम्ही हाणून पाडला.

रोहित पवारांची उडवली खिल्ली

Advt.

यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांची खिल्ली उडवली.
रोहित पवार हे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी प्रसाद वाटत होते.
पण धनगरांच्या घरी वर्षाला पाच बोकड कापतात.
त्यांच्या दावणीला किती कोंबडं असतात, हे तुला माहिती नाही का माकडा?
असे म्हणत पडळकरांनी रोहित पवारांचा माकड असा उल्लेख केला.
धनगर समाज काय उपाशी आहे, तुम्ही प्रसाद वाटताय. धनगरांच्या घरी पाहुणे आले तरी कोंबड कापतात.
तुम्ही आता आयुष्यभर प्रसाद वाटायच्या कामाला आहात, असा टोला पडळकर यांनी रोहित पवारांना लगावला.

Web Title :  MLA Gopichand Padalkar | bjp mla gopichand padalkar criticizes sharad pawar rohit pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘हा कोणता फाजिलपणा सुरू आहे? एकेकाच्या कानाखाली काढेन’, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावलं

Pune Police News | पुणे पोलिस : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 5 कोटी 75 लाख रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना हस्तांतरीत

Gahunje Maval Murder Case | गहुंजेतील सुरज काळभोर खून प्रकरणाला वेगळं वळण, ‘या’ कारणावरून पत्नीनेच ‘गेम’ केल्याचं आलं समोर