MLA Gopichand Padalkar | कोण अजित पवार?, अजित पवारांवर सडकून टीका करताना पडळकर म्हणाले – ‘तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने वागाल तर…’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – कोण अजित पवार? असं म्हणत भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर सडकून टीका केली आहे. मी नुसतं बोलतोय लोक आता जोड्याने मारतील. तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने वागलात तर, लोक आता तुम्हाला जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाहीत, असं म्हणत गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र डागलं. ते बीडमध्ये माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यावर घणाघाती टीका केली. तुम्ही पवारांच्या घरी झाडू मारायला राहिलात, हा काय प्रकार आहे? अरे दिल्लीत देशाचे पंतप्रधान आहेत. या देशाला पुढे नेण्याचे काम ते करत आहेत. प्रत्येक राज्याला भरीव निधी देतात. देशाला एका अवस्थेमध्ये आणणारा पंतप्रधान एवढ्या वर्षानंतर देशाला मिळाला आहे. जागाच्या बाजारपेठेमध्ये देशाची उंची वाढवण्याचे फार मोठे काम त्यांनी केले. त्यामुळे लोक काय बोलतात? याला फार महत्त्व देण्याचे काही काम नाही, असे म्हणत पडळकर यांनी राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासंदर्भात बोलताना पडळकर म्हणाल्या, पंकजाताई भाजपच्या वरिष्ठ नेत्या आहेत.
आणि माननीय संघर्षयोद्धा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Late Gopinath Munde) यांच्या त्या कन्या आहेत.
भाजपच्या त्या मोठ्या नेत्या असून इतर पक्षाच्या लोकांनी काहीही चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करु नये.
भाजप पक्ष वाढवण्याचं, पार्टीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे
साहेबांनी केले. त्यामुळे पंकजाताईंचा विषय हा एकदम व्यवस्थितपणे चालू आहे, कोणीही चिंता करण्याची
गरज नसल्याचे पडळकर यांनी सांगितले. यावेळी मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion)
हा माझा विषय नसल्याचे सांगत त्यांनी काढता पाय घेतला.
Web Title : MLA Gopichand Padalkar | gopichand padalkar slams ncp leader ajit pawar in beed Maharashtra Politics News
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pandharpur Ashadhi Wari 2023 | आषाढी वारीत ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरण करण्यास बंदी