MLA Gopichand Padalkar | श्री. मार्तंड देवस्थानचं स्पष्टीकरण, म्हणाले – ‘आमदार पडळकरांचे वक्तव्य बेजबाबदार, राजकीय आकसापोटी केलेले’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  MLA Gopichand Padalkar | देवस्थानाच्या जमिनी बाबत सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्णयावरून भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला होता. पडळकरांच्या या आरोपावरुन आता श्री. मार्तंड देवस्थानाने (Shri Martand Devasthan) आपले मत मांडले आहे. जेजुरी येथील श्री. मार्तंड देवस्थानाच्या मालकीच्या जमिनीत कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप किंवा ताबा नसून कृपया देवस्थानाच्या कामामध्ये कोणीही राजकारण करू नये, अशा शब्दात श्री. मार्तंड देवस्थानने या जमिनींवर राजकीय ताबा असण्याच्या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केलीय.

पुढे असं सांगितलं आहे की, या सर्व जमिनी देवस्थानाच्या मालकीच्या असून त्या-त्या गावातील शेतकरी या जागांमध्ये वहिवाटीत आहेत.
शोध घेतलेल्या जमिनींबाबत देवस्थान नि:पक्षपातीपणे काम करत आहे.
तरी कोणीही राजकीय आकसापोटी बेजबाबदार वक्तव्ये करू नयेत.
अशी विनंती देखील श्री. मार्तंड देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाकडून करण्यात आली आहे.

श्री मार्तंड देवसंस्थानाचे (Shri Martand Devasthan) प्रमुख विश्वस्त पंकज एकनाथ निकुडे पाटील (Pankaj Eknath Nikude Patil) यांनी सांगितलं आहे की, जेजुरीच्या श्री मार्तंड देवसंस्थाना मालकीच्या खेड तालु्क्यातील चाकण, पुरंदर तालुक्यातील पिसर्वे, इंदापूर तालुक्यातील सणसर व तरंगवाडी,
फलटण तालुक्यातील गिरवी व सांगवी आणि सातारा तालु्क्यातील देगाव व लिंब येथे जमिनी आढळून आलेल्या आहेत. या सर्व जमिनी देवसंस्थानाच्या मालकीच्या आहेत.
काही शेतकऱ्यांनी देवसंस्थानाशी संपर्क देखील साधलेला आहे.
तसेच, देवसंस्थान हे धार्मिक न्यास आहे, तरी याबाबत कोणीही राजकीय आकसापोटी बेजबाबदार विधाने करू नयेत, अशी विंंनंती त्यांनी केली आहे.

 

काय म्हणाले होते पडळकर?

आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी ‘काका-पुतण्या’
असा उल्लेख करत टीका केली आहे.
पडळकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानत या १३३ एकर जमिनीवर कब्जा केल्याचा गंभीर
आरोप केला होता. लवकरच हे जगापुढे उघड होईल, असेही पडळकर म्हणाले.
परंतु, श्री. मार्तंड देवस्थानाने गोपीचंद पडळकर यांचे हे आरोप बेजबाबदारपणे केलेले असल्याचे म्हणत ते फेटाळून लावले आहेत.

 

Web Title : MLA Gopichand Padalkar | no one should make irresponsible statements for political reasons says shri martand devasthan jejuri on statement by mla gopichand padlkar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 155 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Bigg Boss Marathi | उषा नाडकर्णीं, किशोरी शहाणेनंतर ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीची एन्ट्री

Pune Court | शिवाजीराव भोसले सह. बँकेचं 496 कोटीचं अपहार प्रकरण ! आमदार अनिल भोसले, शैलेश भोसले, मंगलदास बांदल यांच्यासह ‘या’ 7 जणांविरूध्द कोर्टात 7380 पानी पुरवणी दोषारोप पत्र