MLA Gopichand Padalkar | आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर न्यूज (Solapur news)  : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांच्या गाडीवर सोलापुरात (Solapur) बुधवारी (30 जून) रोजी सायंकाळी दगडफेक करण्यात आली होती. घोंगडी बैठकीसाठी आमदार गोपीचंद पडळकर सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. मात्र, हल्लेखोर कोण आहेत हे अद्याप सापडले नव्हते. मात्र, आता गाडीवर दगडफेक करणाऱ्या व्यक्तीचे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

आमदार पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांच्या गाडीवर दगडफेक करणारा अमित सुरवसे असे या तरुणाचे नाव आहे. याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना लवकर पकडणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. अमित सुरवसे (Amit Suravase) याला सोलापुरातील दहिटणे परिसरातून गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असल्याची माहिती पुढं आली आहे. या दरम्यान, सोलापूर येथील मड्डी वस्ती ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यानंतर अमित सुरवसे फरार झाला होता. अखेर आज दोन दिवसांनंतर सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या (Solapur Police Commissionerate) गुन्हे शाखेनं त्याला ताब्यात घेतले आहे.

काय आहे प्रकरण?

भाजपचे (BJP) विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांच्या गाडीवर अज्ञाताने दगड फेकला होता. या हल्ल्यात आमदार पडळकर यांच्या गाडीची काच फुटली. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला होता. या व्हिडिओमध्ये एक तरुण आमदार पडळकरांच्या गाडीवर मोठा दगड फेकताना दिसून आला होता. तर, गाडीची काच फोडल्यानंतर या व्यक्तीनं त्याठिकाणाहून पसार झाला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. यावरून हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या (BJP) कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली होती.

Web Title : MLA Gopichand Padalkar | solapur amit survase threw stones mla gopichand padalkar car is in police custody

हे देखील वाचा

7th Pay Commission । केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी ! बँक अकाऊंटमध्ये जमा होणार 2,18,000 रूपये; जाणून घ्या कसे

New Liquor Licence | मुंबईसह राज्याच्या मद्य नियमावलीत सुधारणा होण्याची शक्यता

Builder Avinash Bhosale | प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंच्या मुलाची ईडीकडून चौकशी

Modi Government । नोकरदारांसाठी खुशखबर ! आता सुट्ट्या वाढणार तर PF, पगारात होणार मोठा बदल; लवकरच मोदी सरकार निर्णय घेणार