MLA Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत करणार शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात उपोषण, जाणून घ्या कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या वर्षी 29 ऑक्टोबर 2021 पासून सुरु झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप जवळपास सहा महिने चालला. एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आपल्या विविध मागण्यांसाठी हा बेमुदत संप पुकारला होता. त्यातील मुख्य मागणी म्हणजे एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे. त्यावेळी हा वाद उच्च न्यायालयात देखील गेला होता. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कर्मचाऱ्यांना पगारवाढ देऊन त्यांच्या इतर अनेक मागण्या मान्य केल्या. परंतु, मान्य झालेल्या मागण्यांमधील अनेक मागण्यांची अंमबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) आणि माजी आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) सरकारविरोधात उपोषण करणार आहेत.

 

नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत यांची सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघटना एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी 20 डिसेंबरपासून आमरण उपोषण करणार आहे. तसे पत्र त्यांनी महाराष्ट्र सरकारला पाठवून त्यांची परवानगी मागितली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीवरून विधान परिषदेचे तत्कालीन सभापती रामराजे निंबाळकर यांच्या दालनात सर्व पक्षीय आमदारांची बैठक झाली होती. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या 18 पैकी 16 मागण्यांवर चर्चा झाली होती. चर्चेनंतर या मागण्या मान्य करण्यावर सर्व सहमत झाले होते.
मात्र, मंजूर झालेल्या मागण्यांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.
त्यामुळे सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे अध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar),
कार्याध्यक्ष सदाभाऊ खोत, सरचिटणीस सतीश मेटकरी यांनी शासनाकडे अनेकवेळा या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

परंतु, सरकार यावर तत्परता दाखवत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
त्यामुळे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास 19 डिसेंबर 2022 पासून नागपूर शहरात सुरूवात होणाऱ्या महाराष्ट्र
सरकारच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आम्ही, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सदाभाऊ खोत
यांच्याह पदाधिकारी अधिवेशस्थळी विधानभवनाजवळ आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत 20 डिसेंबरपासून
आमरण उपोषण करत आहोत, अशी माहिती सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघ
महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस सतिश मेटकरी यांनी दिली.

 

Web Title :- MLA Gopichand Padalkar | st strike st association of bjp mla gopichand padalkar and sadabhau khot also demanded agitation against maharashtra government for merger of st employees in government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aaditya Thackeray | ‘समृद्धी महामार्गाला नाव बाळासाहेबांचं, पण नातवालाच…’; आदित्य ठाकरेंनी व्यक्त मनातली खंत

Subramanian Swamy | सुब्रमण्यम स्वामी यांनी नरेंद्र मोदींची केली रावणाबरोबर तुलना

Shriya Saran | श्रिया सरनच्या ‘या’ वक्त्यव्यामुळे ती चर्चेत; ‘या’ महिला अभिनेत्रीवर क्रश असल्याचे सांगितले