MLA Jitendra Awhad | ‘दादा, नवीन पक्ष काढा, नवीन चिन्ह घ्या आणि स्वत:च कर्तृत्व सिद्ध करा”, जितेंद्र आव्हाडांचे आव्हान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) त्यांच्यात धमक असेल तर त्यांनी नवीन पक्ष काढावा, असा सल्ला अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवसेना (Shivsena) फुटल्यानंतर दिला होता. वक्तव्याचा अजित पवारांचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांनी एक्स वर पोस्ट करत अजित पवारांना स्वत:चा पक्ष काढून कर्तृत्व सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे. काल अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली होती, या टीकेला आव्हाडांनी (MLA Jitendra Awhad) हे आव्हान देत उत्तर दिले आहे.

‘एक्स’वरील पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना उद्देशून म्हटले आहे की, दादा, तुम्ही महाराष्ट्राला कायम स्वत:ची ओळख करुन देताना म्हणत आला आहात की, मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे. प्रसंगी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी! शिवसेना फुटल्यानंतर केलेल्या भाषणांत आजचे मुख्यमंत्री ज्यांच्या मंत्री मंडळात आपण उपमुख्यमंत्री आहात त्यांना आपण एक सल्ला दिला होता. त्या सल्ल्याप्रमाणे आपण वागलात तर महाराष्ट्रात आपले कौतुक होईल.

जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांनी पुढे म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवारांनी जन्म
दिला आहे. त्याचं पालन पोषण शरद पवारांनीच केलं. त्याचं संगोपनही पुढे शरद पवारांनीच केलं.
शरद पवारांमुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढला आणि तो फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभरात वाढला.
मग, जसं आपण म्हटलात तसं निर्णय घ्या आणि एक नवीन पक्ष काढा, नवीन चिन्ह घ्या आणि स्वत:च कर्तृत्व सिद्ध करुन दाखवा.

शिवसेना फुटल्यावर अजित पवार म्हणाले होते…
शिवसेना फुटल्यावर एकनाथ शिंदे यांना उद्देशून अजित पवार यांनी म्हटले होते की, तुमच्यात धमक होती तर काढा ना पक्ष.
तुम्हाला कुणी आडवले होते. ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला. ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला.
शिवाजी पार्कला काढलेला पक्ष महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवला. त्यांचाच पक्ष काढून घेतला. त्यांचेच चिन्ह काढून घेतले.
हे जरी निवडणूक आयोगाने (Election Commission) दिले असले तरी जनतेला पटलेय का? त्याचाही विचार झाला पाहिजे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jitendra Awhad On Ajit Pawar | शरद पवारांना संपवण्याची त्यांनी सुपारी घेतलीय, कालपर्यंत दैवत…, आव्हाडांचा अजित पवारांवर थेट आरोप

Ajit Pawar On Sharad Pawar | अजित पवारांनी सांगितला पक्षफुटीचा पडद्यामागील घटनाक्रम, शरद पवारांवर केला ‘हा’ आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड शहरात बनावट ‘पॅराशूट’ तेलाची विक्री, व्यवसायिकावर गुन्हा

Ajit Pawar On Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा लढवण्याची अजित पवारांची घोषणा, आव्हानानंतर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया

Pune Crime News | कमी रकमेच्या वीजबिलासाठी परस्पर वीजमीटर बदलले, दोन तोतया कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल