…तर उपोषणाची वेळ आली नसती : आ. कैलास पाटील

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन –  पाच वर्षे सत्तेत असताना जर लक्ष दिले असते तर आज उपोषणला बसण्याची वेळ आली नसती असा टोला धाराशिवचे शिवसेनेचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या पाणी प्रश्नावर करत असलेल्या उपोषणावर मारला. आमदार कैलास पाटील यांनी कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयास अचानक भेट देवुन पाहणी केली यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या संदर्भात अनेक नागरिकांच्या तक्रारी माझ्याकडे आल्याने आज रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर व कर्मचारी यांची रिक्त पदे भरण्यासाठी व रेफर केंद्र हा दवाखान्याचा शिक्का कायमस्वरूपी पुसुन अद्ययावत दवाखाना करण्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

सोयाबीन पिक विम्यातुन जिल्ह्याला वगळण्यात आले नसुन संपुर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन विम्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ही त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, शहरप्रमुख प्रदीप मेटे, उपसरपंच सचिन काळे, गजानन चोंदे, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख सागर बाराते, पंचायत समितीचे उपसभापती गुणवंत पवार, अॅड. मंदार मुळीक यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.