माझी लोकसभेची हौस फिटली : आमदार कर्डीले

केडगाव : पोलीसनामा ऑनलाईन – ‘माझी लोकसभेची हौस आता फिटली आहे. त्यामुळे मी कधीही लोकसभा लढवणार नाही, असं आमदार कर्डीले यांनी म्हटलं आहे. नगरमधील निमगाव घाणा येथील विविध विकास कामांच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी अशी भूमिका मांडली आहे.

औटी यांना कायद्याचे मोठे ज्ञान आहे. इंग्रजी आणि हिंदी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. ते लोकसभेत गेले तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. मला इंग्रजी, हिंदी येत नाही. मी दिल्लीत गेलो तर मोठा प्रश्न निर्माण होईल. तशीही माझी लोकसभा लढण्याची हौस आता फिटली आहे. आमदार औटी यांनी शिवसेनेकडून लोकसभा लढवावी, असं भूमिका कर्डिले यांनी मांडली. मी त्यांना पाठींबा देईल. तुम्ही विधासभेचे उपाध्यक्ष आहात. मला विधानसभेत बोलायला जास्त वेळ द्या, असंही कर्डीले यांनी म्हटलं.

कर्डिले यांनी भाषण केल्यानंतंर आमदार औटी यांनी भाषण देत औटी यांनी चिमटे काढले. ‘आमदार कर्डीले मुरब्बी आहेत. मला पुढे काढून द्या म्हणजे तुमचा मंत्री पदाचा मार्ग मोकळा होईल, असे तुम्हाला वाटत असेन. पण मी लोकसभा लढणार नाही’ असा टोला आमदार औटी यांनी लगावला.

आमदार कर्डीलेंना राजकारणाचा मोठा अभ्यास आहे. राहुरी मतदार संघ त्यांचा आता पाठ झाला आहे. त्यांच्या निवडणुकीत या भागातील त्यांचे कार्यकर्ते राहुरीत जातात. हे माझ्यासाठी चांगलेच आहे. काम कसे करावे हे कर्डीले यांच्याकडून शिकावे, असं कौतुक त्यांनी यावेळी केले.

कर्डीले मुरब्बी आहेत. मला ते सभागृह अध्यक्ष आणि लोकसभेतून दिल्लीला पाठवू इच्छितात. मला पुढे पाठवले की त्यांचा मंत्रीपदाचा रस्ता मोकळा होईल, असे त्यांना वाटत असावे. त्यासाठी पूर्वीच मला कर्डीले आणि पालकमंत्री राम शिंदे यांनी एका कार्यक्रमात लोकसभा लढण्याची ऑफर दिली होती. पण मी आजच सांगतो, मी लोकसभा लढवणार नाहीच, असं त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कर्डीले साहेब तुम्हाला जे जमले नाही ते मला कसे जमणार ? तुम्ही भाषण फार छान करता. आता सभागृहात तयारी करून या. मी पहिल्या पाचमध्ये तुमचा नंबर लावतो, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.