2017 उन्नाव रेप केस : भाजप निलंबीत आमदार कुलदिप सेंगरला जन्मठेपेची शिक्षा, 25 लाखाचा दंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी ठरवण्यात आलेला भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याला न्यायालयाकडून 20 डिसेंबरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तीस हजारी न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे. कुलदीप सेंगरला जन्मठेपेसह 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेला आज अखेर न्याय मिळाला आहे. आता कुलदीप सेंगर आपले संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवेल.

उन्नाव बलात्कर प्रकरणासंबंधित निर्णय सोमवारी 16 डिसेंबरला न्यायालयाने सुनावला होता. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने सोमवारी आपला निर्णय सुनावताना सांगितले की भाजपचे आमदार कुलदीप सिंह सेंगर याला दोषी ठरवण्यात आले आहे. तसेच आणखी एका आरोपीला शशि सिंह यांना न्यायालयाने निर्दोष सोडले आहे.

2017 मध्ये पीडितेबरोबर दुष्कर्म झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर 2018 मध्ये सीबीआयने संबंधित प्रकरण दाखल केले होते. सेंगरच्या विरोधात बलात्कार आणि अपहरणाप्रकरणी तीस हजारी कोर्टात सुनावणी सुरु होती. सेंगरवर आता 3 प्रकरणं दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टात सुरु आहेत. आता सेंगरला या प्रकरणी दोषी ठरवण्यात आल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कुलदीप सेंगरला 15 एप्रिल 2018 ला ताब्यात घेण्यात आले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/