MLA Laxman Jagtap | आमदार लक्ष्मण जगताप यांची तब्येत ठणठणीत; हॉस्पिटलमधून हात हलवत चाहत्यांना दिला प्रतिसाद

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Laxman Jagtap | चिंचवड भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी बिघडली. गेले काही दिवस ते रुग्णालयात होते. मात्र नेत्याची प्रकृती अस्वस्थ असताना इकडे त्यांच्या कार्यकर्त्याच्या मनातही घालमेल होऊ लागली होती. तसं तर पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मधील अनेक कार्यकर्त्यांनी लक्ष्मणभाऊ जगताप ठणठणीत बरे व्हावे यासाठी देवाला साकडं घातलं होतं. आता लक्ष्मणभाऊ जगताप यांची प्रकृती ठणठणीत होत असून लवकरच पुन्हा एकदा लोकांच्या सेवेत अवतरणार आहेत.

 

आमदार जगताप (MLA Laxman Jagtap) यांना काही काळ व्हेंटिलेटर लावण्यात आला होता.
सर्व हालचाल मंदावल्याने सर्वांच्या जीवाला घोर लागला होता. त्यांच्या तब्येतीची माहीती समजताच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), विधानसभेतील विरोधी नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), विधान परिषदेतील विरोधी नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar), केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), रामदास आठवले (Ramdas Athawale), माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आदींनी थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली.
तसेच, स्वत: अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी अमेरिकेतून एक अत्यंत महत्वाचे इंजेक्शन मिळविण्यासाठी प्रयत्न केले.

इंजेक्शन दिल्यावर आमदार जगताप यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली.
पंधरा दिवसात चांगला फरक पडला. दरम्यान, त्यानंतर आज (गुरूवारी) सकाळी भाऊंनी थेट हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून बंद काचेच्या खिडकितून आपल्या चाहत्यांना हात केला आहे.
त्यानंतर कार्यकर्ते खूश होऊन मोरया पावला, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
कदाचित आठवडाभरात भाऊंना घरी सोडण्यात येईल, असं त्यांचे धाकटे बंधू शंकर जगताप (Shankar Jagtap) म्हणाले.

 

दरम्यान, आज हॉस्पिटलच्या खिडकितून आमदारांनी सर्वांना हात हालवत, हसतमुखाने प्रतिसाद दिल्याने भाजपासह सर्वांचा उत्साह दुणावला आहे.
आमदार जगताप यांच्याशिवाय भरभक्कम नेतृत्व नसल्याने भाजपाची गाळण उडाली होती, आता ते देखील सावरले आहेत.
आमदार जगताप यांना लवकर बरे वाटू दे यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी पुन्हा प्रार्थना सुरू केली आहे.

 

 

Web Title :- MLA Laxman Jagtap | MLA Laxman Jagtaps health is good now he responded fans by shaking hands from the hospital

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा