MLA Laxman Jagtap | पुणे महापालिकेच्या धर्तीवर ‘शहरी गरीब वैद्यकीय योजना’ सुरू करा; आमदार लक्ष्मण जगताप यांचे प्रशासनाला खडेबोल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Laxman Jagtap | पिंपरी-चिंचवड महापालिकेत (Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नसल्यामुळे महापौर निधीतून गोरगरीब रुग्णांना देण्यात येणारी आर्थिक मदत बंद करण्यात आली आहे. हा शहरातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांवरील अन्याय आहे. याबाबत कोणताही पर्याय न काढता प्रशासन गाढ झोपेत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. शहरातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) धर्तीवर पिंपरी चिंचवड पालिकेने ‘शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना’ (Shahari Garib Vaidyakiya Yojana) लवकर सुरू करावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) यांनी केली.

 

या संदर्भात आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) यांनी आयुक्त शेखर सिंह (Commissioner Shekhar Singh) यांना दिलेल्या निवेदन दिले. त्यांनी म्हटले आहे की, शहरातील गोरगरीब व गरजू रुग्णांच्या औषधोपचारासाठी, मानवनिर्मित आपत्ती समयी पीडितांना अर्थसहाय्य करण्याच्या उद्देशाने 4 सप्टेंबर 1999 रोजी धर्मदाय आयुक्तांकडे पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वजनिक चॅरीटेबल ट्रस्ट (Public Charitable Trusts) सुरू झाले. परंतु, महापालिकेची मुदत संपल्यानंतर निवडणूक न झाल्याने प्रशासकाची नियुक्ती झाली. त्यानंतर महापौर निधीतून (Mayor Fund) रुग्णांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीची योजना बंद करण्यात आली आहे. महापौर नाहीत म्हणून प्रशासनाने पर्यायी मार्ग शोधण्याची आवश्यकता होती. पण दुर्दैवाने तसे झालेले नाही.

 

पुणे महापालिका त्यांच्या हद्दीतील गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी ‘शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना राबवते. या योजनेअंतर्गत गरीब व गरजू नागरिकांना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संलग्न खासगी दवाखान्यांमध्ये सवलतीच्या दरात उपचार मिळतात. खासगी रुग्णालयात घेण्यात आलेल्या उपचारांसाठी महापालिकेकडून एक लाख रूपयापर्यंत आर्थिक मदत केली जाते.

पुणे महापालिकेची शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना गरीब व गरजू रुग्णांसाठी अत्यंत चांगली आहे.
या योजनेचा पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्वांगिण अभ्यास करावा.
या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमधील गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी अटी व शर्तीसह परिपूर्ण वैद्यकीय योजना तत्काळ सुरू करावी, असे जगताप म्हणाले.

 

Web Title :- MLA Laxman Jagtap | Start an ‘Shahari Garib Vaidyakiya Yojana’ like the Pune Municipal Corporation (PMC)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | पेंग्विन आणल्याने राज्याचा विकास होतो का?, अजित पवारांच्या प्रश्नाला बावनकुळेंचा रोखठोक सवाल

Beed ACB Trap | 1500 रुपये लाच घेताना सहायक सरकारी महिला वकील अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Maharashtra Politics | पत्राचाळ प्रकरणी अतुल भातखळकर यांचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘शरद पवार हेच खरे रिंग मास्टर…’