MLA Madhukar Thakur | माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे वाढदिवसाच्या दिवशीच निधन

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – माजी आमदार मधुकर ठाकूर (Madhukar Thakur) यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले आहे. वाढदिवसाच्या दिवशी (Birthday) सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 15 जुलै रोजी त्यांचा वाढदिवस होता. मधुकर ठाकूर (Madhukar Thakur) हे अलिबाग (Alibaug), उरण (Uran) मतदारसंघाचे माजी आमदार होते. मागील 3 ते 4 वर्षापासून ते आजारी होते.

मधुकर ठाकूर यांचा राजकीय प्रवास

झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य झाले. 2004 ते 2009 या काळात अलिबाग-उरण मतदार संघाचे ते आमदार होते. रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

32 वर्षांनी शेकापचा पराभव

काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी 2004 मध्ये शेकापच्या तत्कालीन राज्यमंत्री मीनाक्षी पाटील (Meenakshi Patil) यांचा पराभव करुन संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. ठाकूर यांच्या विजयामुळे शेकापला अलिबागमध्ये तब्बल 32 वर्षानंतर पराभवाचा सामना करावा लागला होता. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे यांचे सोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील 34 वर्षीय महिलेचे न्यूड फोटो अन् व्हिडीओ काढून 1 कोटीची मागणी; वानवडी पोलिस ठाण्यात FIR

Anil Deshmukh | सचिन वाझे आणि अनिल देशमुखांची फक्त एकदाच भेट; वकिलाचा दावा

Vishwanath Kelkar | ठाणे महापालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा, प्रचंड खळबळ; जाणून घ्या प्रकरण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  MLA Madhukar Thakur | mla madhukar thakur passes away on his birthday day raigad alibaug

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update