आमदार माधुरीताई मिसाळ यांच्यावर भाजपनं सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरीताई मिसाळ यांच्यावर भारतीय जनता पार्टीनं आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांची पिंपरी-चिंचवडच्या जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदीर्घ अनुभव व कार्याचा फायदा जिल्ह्यायील संघटना वाढीस निश्चितपणे होईल, आपण ही जबाबदारी सर्वांना सोबत घेऊन यशस्वीरीत्या पार पाडाल असे म्हणत प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी त्यांची पिंपरी-चिंचवडच्या जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.