आमदार माधुरी मिसाळ पुणे भाजपच्या शहराध्यक्षा तर गणेश बीडकर सरचिटणीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर भाजपच्या अध्यक्षपदी आमदार माधुरीताई मिसाळ तर सरचिटणीस पदी गणेश बीडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणा आज (सोमवार) संध्याकाळी करण्यात आली. दरम्यान, पुणे शहर भाजपचे मावळते शहराध्यक्ष योगेश गोगावले यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर पालकमंत्री पदाचा खा. गिरीश बापट यांनी राजीनामा दिला होता. पालकमंत्री म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांनी केली होती. पुण्यात बदल करण्याचे संकेत चंद्रकांत पाटील यांनी यापुर्वीच दिले होते. शहरातील सर्वच समीकरणे लक्षात घेवुन चंद्रकांत पाटील यांनी शहर भाजपमध्ये बदल केल्याचे बोलले जात आहे. आमदार माधुरीताई मिसाळ यांची भाजप शहराध्यक्ष पदी निवड झाली आहे तर गणेश बीडकर यांची सरचिटणीस पदी निवड झाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like