Video : ‘तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करु’ गाण्यावर भाजप आमदार महेश लांडगे यांचा झुम्बा डान्स

भोसरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महापालिका, सायकल मित्र, अविरत श्रमदान आणि महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज (रविवार) रिव्हर सायक्लोथॉन 2021 चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील अनेक सायकलप्रेमींनी सहभाग घेतला होता. भोसरी येथील गाव जत्रा मैदान येथून सायक्लोथॉनची सुरुवात आणि शेवट झाला. यावेळी भोसरीचे आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landage)  हे ‘तुझको मिरची लगी तो मै क्या करु’ या गाण्यावर थिरकताना दिसले. आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landage) यांना कार्यक्रमांचा बादशहा म्हणून ओळखले जाते.

 

 

 

 

 

 

 

पब्लिसिटी रॅली असो किंवा निवडणुकीची रॅली त्यांचा प्रत्येक कार्यक्रम चर्चेचा विषय असतो. आमदार महेश लांडगे केवळ मोठ्या कार्यक्रमासाठीच प्रसिद्ध नाहीत तर प्रत्येक उपक्रम आणि कार्यक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. आजही त्यांनी सायक्लोथॉन मध्ये सहभागी झालेल्या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ते सहभागी झाले होते. यावेळी तरुणांना प्रोत्साहीत करण्यासाठी तुझको मिर्ची लगी तो मै क्या करुं या गाण्यावर झुंबा डान्स केला. त्यांना थिरकताना पाहून उपस्थितांनी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवून चांगलीच दाद दिली.

10 किमी आणि 25 किमी अशा दोन टप्प्यांमध्ये ही रॅली झाली. यामध्ये शहरातील अनेक सायकलप्रेमींनी सहभाग नोंदवला होता. तरुणांना व्यायामाचे, सायकल चालवण्याचे महत्व पटवून देण्यासाठी या सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या झुंबा डान्समुळे या कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली होती. सायक्लोथॉनमध्ये आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या झुंबा डान्सची सध्या शहरात चर्चा रंगली आहे.