‘या’ आमदाराचा पूरग्रस्तांसाठी महिन्याच्या पगार, 11 लाखांची रक्कम

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना मदतीसाठी सगळीकडूनच ओघ सुरू आहे. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन व आमदार निधीतून अकरा लाख रुपये असा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पूरग्रस्तांसाठी सुपूर्द केला आहे.

महाकाय पुरामुळे अनेक लोकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. कित्येक जण आपआपल्या परिने मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. अशीच मदत भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी केली आहे. मोनिका राजळे यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी १ महिन्याच्या मानधनासह ११ लाख रुपयांची अतिरिक्त रक्कम आमदार निधीतून देऊ केली आहे. त्यांनी ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे सुपूर्द केली आहे. ही मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहचवली जाणार आहे.

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांचे सासरे व माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांच्या ७५व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मोनिका राजळे यांनी स्वतःचा एक महिन्याच्या पगार आणि ११ लाख रुपयांची आर्थिक मदत ही सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी दिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त