खासदार नवनीत राणांची CM ठाकरेंवर जळजळीत टीका, म्हणाल्या – ‘तुम्ही लायक असता तर दिल्लीत येण्याची गरजच नव्हती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (दि. 8) दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीवरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. मुख्यमंत्री लायक असते तर त्यांना दिल्लीत जाण्याची वेळच आली नसती. आई-वडील कधीही आपल्या मुलांसाठी रडत नाहीत, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

कामाची गोष्ट ! App बनावट आहे कि Fake? डाउनलोड करण्यापूर्वी ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा…

मुख्यमंत्री ठाकरे यांना अनेक विषयांवर मोदींना भेटायचे होते. त्यामुळे त्यांनी ही संधी साधल्याचे राणा (navneet rana) म्हणाल्या. दरम्यान उच्च न्यायालयाने आजच खासदार राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करत त्यांना मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. दरम्यान, कोर्टाच्या या निर्णयानंतर न्याय मागण्यासाठी मी सर्वोच्च न्यायालयात जाईन. मला न्यायावर विश्वास असल्याचे राणा म्हणाल्या.

Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 529 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
यावेळी जात प्रमाणपत्र रद्द झाल्यावरून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले आहे.
तसेच त्यांना 2 लाखांचा दंड ठोठावला आहे.
यावर राणा यांनी मोठा खुलासा केला आहे.
उच्च न्यायालयाने दिलेला आदेश मी अद्याप वाचला नाही.
पण यात पॉलिटिकल खिचडी शिजल्याचा धक्कादायक आरोप राणा यांनी केला आहे.
कारण, अचानक कोर्टाचा असा निर्णय येणे म्हणजे कुठेतरी काहीतरी शिजलयं हे नक्की असे त्या म्हणाल्या.
गेल्या 9 वर्षापासून मी हा लढा लढत आहे.
यात कोणी राजकारण केल हे मला सांगण्याची गरज नाही.
पण माझा आणि शिवसेनाचा हा वाद सगळ्यांनाच माहिती असल्याचे राणा म्हणाल्या.

Also Read This : 

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

 

Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत

 

PM मोदी अन् मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या भेटीवर उदयनराजेंनी साधला निशाणा, म्हणाले…

 

संतापजनक ! 70 वर्षाच्या नराधमाकडून 10 वर्षाच्या मुलीवर घरात घुसून लैगिंक अत्याचार, कोंढव्यातील घटना

 

मर्सिडीजने सादर केली सर्वात शानदार कार, किंमत 2.60 कोटी रुपये