MLA Nilesh Lanke | राज्यात सत्ता आणि पैशांचा गैरवापर सुरु आहे, निलेश लंकेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांनी राज्य सरकारवर (State Government) टीका केली आहे. राज्यात कधी नव्हे ते येवढ्या मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीने राज्यकारभार सुरु आहे. राज्यात एक प्रकारची हिटलरशाही सुरु आहे, असे निलेश लंके (MLA Nilesh Lanke) म्हणाले.

 

निलेश लंके (MLA Nilesh Lanke) म्हणाले गेल्या काही वर्षांपासून राज्यात राजकारणाची दिशा बदलली आहे. राज्यात अत्यंत चुकीच्या पद्धतीने राज्य कारभार सुरु आहे. राज्य सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांची गय केली जात नाही. जो कोणी राज्य सरकारच्या विरोधात बोलत असेल, त्याच्या मागे चौकशी लावणे आदी प्रकार सुरु आहेत. सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर देखील राज्यात केला जात आहे. राज्यात हिटलरशाही पद्धतीचा कारभार सुरु आहे, असे लंके म्हणाले.

 

राज्य सरकारने परतीच्या पावसाने नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना आनंदाचा शिधा वाटप केले आहे.
त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे फोटो आहेत.
त्यावर देखील लंके यांनी शिंदे सरकारवर टीका केली. केवळ जाहिरात करणे हा सरकारचा धंदा झाला आहे.
त्यांना लोकांच्या भावनांसोबत आणि कामासोबत काही देणे घेणे नाही आहे. सरकारला केवळ आपली जाहिरात कशी होईल आणि जाहिरातीच्या माध्यमातून आपण कसे घराघरांत पोहोचू हा उद्देश आहे.
शिधावाटप झालेले नाही. फक्त जाहिराती झाल्या आहेत, असे देखील लंके यांनी यावेळी म्हंटले.

ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करण्याची मागणी आम्ही केली आहे.
विरोधी पक्षनेता अजित पवार (Ajit Pawar) यांनी ओला दुष्काळाची मागणी लावून धरली आहे,
तरी देखील दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शेतकरी संकटात आहे.

 

Web Title :- MLA Nilesh Lanke | Misuse of power and money is going on in the state, Nilesh Lanka will attack the state government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kishori Pednekar | किशोरी पेडणेकर यांना राज ठाकरेंचे नाव घेतल्याशिवाय राहवत नाही, मनसेचा खोचक टोला

MLA Bachchu Kadu | रवी राणा आणि बच्चू कडू यांनी समजुतीने घेतले पाहिजे – आ. श्रीकांत भारतीय

Virat Kohli | विराट कोहलीने टी-20 विश्वचषकात रचला इतिहास; ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलचा मोडला ‘तो’ रेकॉर्ड