MLA Nilesh Lanke | अजित पवारांच्या सीएमपदावरून आमदार निलेश लंकेचा युटर्न? म्हणाले शरद पवार कुटुंबप्रमुख…

धाराशिव : पोलीसनामा ऑनलाईन – MLA Nilesh Lanke | काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांना आपल्याला मुख्यमंत्री बनवायचं आहे, कामाला लागा असे आदेश होते. त्यामुळे अजित पवार हेच राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. त्यानंतर आता आमदार निलेश लंके यांनी आता युटर्न घेत राष्ट्रवादी हे एक कुटुंब असून, या कुटुंबात कोणाला कोणती जबाबदारी द्यायची याचे सर्व अधिकार हे कुटुंबप्रमुख म्हणून शरद पवार यांना असल्याचे म्हंटले आहे. (MLA Nilesh Lanke)

नेमंक काय म्हणाले निलेश लंके?

काही दिवसांपूर्वी निलेश लंके यांनी एका कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांना आपल्याला मुख्यमंत्री बनवायचं आहे, कामाला लागा असे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले होते. मात्र आता आपल्या वक्तव्यावरून लंके यांनी युटर्न घेतल्याचे दिसत आहे. आमदार लंके हे धाराशिव जिल्ह्यातील संजीपूर येथे जल जिवन मिशन पाणी पुरवठा योजनेच्या भुमीपुजन कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते राष्ट्रावादी हे कुटुंब असून यात कोणती जबाबदारी कोणाला द्यायची याचे सर्व अधिकार कुटुंब प्रमुख म्हणून शरद पवार यांना असल्याचे म्हणाले आहेत. (MLA Nilesh Lanke)

मुख्यमंत्रीपदावरून पोस्टरबाजी

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या मुख्यालयाबाहेर काही पोस्टर लावण्यात आले होते.
त्या पोस्टरमध्ये सुप्रिया सुळे यांचा भावी पहिल्या महिला मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता.
तर दुसरीकडे अजित पवारांचेदेखील असेच पोस्टर लावून भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आला होता. या पोस्टरबाजीमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती.

Web Title :- MLA Nilesh Lanke | nilesh lankes reaction on ajit pawars post as chief minister