MLA Nitesh Rane | आमदार नितेश राणेंना जामीन मिळताच CM उद्धव ठाकरेंवर घणाघात; म्हणाले…

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Nitesh Rane | शिवसेना कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांना बुधवारी सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर त्यांची सुटका करण्यात आलीय. जामीन मिळाल्यानंतर नितेश राणे यांनी अनेक विषयावरुन प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याचबरोबर नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर घणाघात केला आहे. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

नितेश राणे म्हणाले, “हा जो काही एकूण विषय आहे, हा राजकीय आजार आहे, असा माझ्यावर आरोप करण्यात आला. न्यायालयीन कोठडी आहे, म्हणून यांनी हा राजकीय आजार काढलाय. चला आपण मानूयात नितेश राणे खोटं बोलत होते. खोटं बोलतोय त्याला तुरुंगात जायचं नाहीये, पण ज्या यंत्राच्या मदतीने माझा रक्तदाब तपासला जायचा, जे माझे रिपोर्ट काढले जायचे, ते ही खोटे होते का ?,” असा सवाल नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी उपस्थित केला आहे.

 

”एखाद्याच्या आजारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं ही राज्याची नितिमत्ता आहे का ? हे नैतिकतेत बसतं का ? असा प्रश्न उपस्थित करत नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. ”लता दीदींच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात बेल्ट नाही, आणि मग अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री आजारी का पडतात”, असां सवाल देखील नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

“महाविकास आघाडीचे जे नेतेमंडळी आहेत, त्यांच्यावर जेव्हा ईडीच्या कारवाया सुरु होतात, तेव्हाच त्यांना 14 दिवस कोरोना कसा होतो ? हे प्रश्न आम्ही विचारले चालेल का ? असं देखील नितेश राणे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आजच मी दुपारी सिंधुदुर्गात रक्तदाब तपासला. 152 इतका होता. मी काय त्या यंत्रात बोट घातलं होतं का की जेणेकरुन खोटी माहिती बाहेर येईल,” असं ते म्हणाले.

 

पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, ”कोणाच्याही तब्येतीवर अशा प्रकारे प्रश्न उचलणं हे किती नैतिकतेत बसतं, राज्याच्या संस्कृतीला हे साजेसं आहे का, हा विचार या निमित्ताने करायला हवा. मग प्रश्नच विचारायचे असतील, तर आम्हीही खूप विचारु शकतो,” असंही ते म्हणाले.

 

Web Title :- MLA Nitesh Rane | bjp mla nitesh rane critisize to chief minister uddhav thackeray in sindhudurga

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा