MLA Nitesh Rane | जामीन मिळाल्यानंतर आमदार नितेश राणेंची प्रकृती सुधारली; कोल्हापूरच्या CPR मधून डिस्चार्ज मिळणार

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Nitesh Rane | शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणी अडचणीत सापडलेले भाजपचे आमदार नितेश राणेंना (MLA Nitesh Rane) अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर जामीन (Bail) मंजूर झाला. प्रकृती बिघडल्याने नितेश राणेंना कोल्हापूरच्या (Kolhapur) शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कालपर्यंत नितेश राणे यांना छातीच्या दुखण्यासोबत उलट्यांचा आणि स्पॉन्डिलाइटिसचा प्रचंड त्रास जाणवत होता. परंतु, सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने (Sindhudurg Sessions Court) जामीन मंजूर केल्यानंतर नितेश राणे यांना आज (गुरूवारी) लगेचच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे, त्यामुळे ते लगेच सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना होणार असल्याचे समजते.

 

छातीत दुखत होते त्यामुळे चांगल्या ह्रदयरोग तज्ज्ञांकडून उपचार करवून घेण्यासाठी नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांना ओरोस जिल्हा रुग्णालयातून (Oros District Hospital) कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात (CPR Hospital) दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती सुधारली असल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात येणार आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर नितेश राणे सीपीआर रुग्णालयातून सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना होतील. सिंधुदुर्गात आल्यानंतर नितेश राणे यांची ओरोस जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी होईल. त्यानंतर नितेश राणे जामिनाचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी सावंतवाडी कारागृहात जातील. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नितेश राणे यांची जामिनावर सुटका होईल.

दरम्यान, आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) आणि त्यांचे खासगी सचिव राकेश परब (Rakesh Parab) यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने (District And Sessions Court) बुधवारी जामीन मंजूर केला.
दरम्यान, नितेश राणे आणि राकेश परब यांना पोलिसांकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत कणकवली तालुक्यात प्रवेश बंदी केलीय.
त्याचबरोबर या दोघांनाही ओरोस पोलीस ठाण्यात आठवड्यातून एकदा हजेरी लावावी लागणार आहे.
तसेच तपास कामात पोलिसांना गरज भासल्यास सहकार्य करावे, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
त्याचबरोबर न्यायालयाने या दोघांचीही प्रत्येकी तीस हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे.

 

Web Title :- MLA Nitesh Rane | nitesh rane will get discharge from cpr hospital kolhapur after sessions grants bail

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा