MLA Nitesh Rane | नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापा, आ. नितेश राणेंची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भारतीय चलनी नोटांवर (Indian Currency) गणपती आणि लक्ष्मीचा फोटो लावावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे (Central Government) केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजप (BJP) आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी देखील मोठी मागणी केली आहे. भारतीय नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावावा, असे नितेश राणे (MLA Nitesh Rane) म्हणाले आहेत.

आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. नोटांवर मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) फोटो लावण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी शिवाजी महाराजांची फोटो असलेली एक 200 रुपयांची नोट देखील ट्वीट केली आहे. राणे याबाबत म्हणाले, शिवाजी महाराजांना देशात नाहीतर जगात मान्यता आहे. त्यामुळे माझी वैयक्तीत भावना आहे. शिवप्रेमी म्हणून मी व्यक्त झालो आहे. त्यामुळे त्यांचा फोटो नोटांवर टाका.

दोन दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी देखील अशीच गजब मागणी केली.
त्यामुळे राजकीय वर्तुळात त्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या.
आगामी गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केजरीवाल स्वत:ला हिंदुत्वावादी नेता म्हणून घेत आहेत, असे विरोधी पक्षांनी म्हंटले आहे.

केजरीवाल यांच्या या वक्तव्यावर भाजप आमदार प्रसाद लाड (MLA Prasad Lad) यांनी प्रतिक्रिया दिली होती.
अरविंद केजरीवाल नौटंकीबाज मुख्यमंत्री आहे. त्यांना आता स्वत:ला हिंदुत्वावादी नेता म्हणून पुढे यायचे आहे.
गुजरातमधील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही मागणी केली आहे.
केजरीवाल यांच्या मागणीवर काँग्रेसने (Congress) देखील भाष्य करत टीका केली आहे.
नोटांवरील गांधीजींचा फोटो हटविण्याचा भाजपचा अजेंडा होता.
आणि तो अरविंद केजरीवाल पुढे घेऊन जात आहेत, असे काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी
म्हंटले होते.

Web Title :- MLA Nitesh Rane | put the photo of chhatrapati shivaji maharaj on the indian currency demand of bjp mla nitesh rane

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray Group | रवी राणा बच्चू कडू भांडणावर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचे तोंडसूख, म्हणाले…

Har Har Mahadev | बॉक्स ऑफिसवर ‘हर हर महादेव’चा जयघोष! पहिल्याच दिवशी चित्रपटाने जमवला कोट्यवधीचा गल्ला!