MLA Nitesh Rane | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुक ! आमदार नितेश राणेंना मतदानाचा हक्क नाकारला

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Nitesh Rane | सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीची (Sindhudurg District Central Co-operative Bank Election) सध्या रणधुमाळी सुरू आहे. आज (गुरुवारी) मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान या निवडणूकीत सिंधुदुर्गात राजकीय घडामोड पाहायला मिळते. निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसैनिकाला झालेल्या मारहाण प्रकरणात नितेश राणे (MLA Nitesh Rane) अडचणींच्या कचाट्यात सापडले आहेत. यानंतर त्यांनी अटकपुर्व जामीन अर्ज देखील दाखल केला. त्यावर आज सुनावणी असतानाच दुसरीकडे नितेश राणेसह भाजपला (BJP) मोठा दणका बसला आहे. नितेश राणेंना मतदानाचा हक्क नाकारला आहे.

नितेश राणे (MLA Nitesh Rane) ज्या संस्थेचे सदस्य आहेत. त्या सिंधुदुर्ग (Sindhudurg) शिक्षण प्रसारक मंडळाने जिल्हा बँकेकडून (Narayan Rane) कर्जरुपी घेतलेले 16 कोटी रुपये थकीत आहेत. यामुळे सहकार विभागाने राणेंना मतदानाचा अधिकार नाकारला आहे. तर, या निवडणुकीत नारायण राणे यांच्यासह नितेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. खरंतर आज होणाऱ्या निवडणुकीत सिद्धीविनायक पॅनलचे उमेदवार मनीष दळवी (Manish Dalvi) यांचे नाव संतोष परब (Santosh Parab) मारहाण प्रकरणात आल्यामुळे मनीष दळवी यांनी जिल्हा सत्र न्यायालयात (District Sessions Court) अंतरिम जामिनासाठी अर्ज केला. मात्र निकाल प्रलंबित असल्याने आज प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत मनीष दळवी आपला मतदानाचा हक्क आहे तो कसा बजावतात? हे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचे समृद्धी सहकार पॅनल आणि भाजपचे सिद्धिविनायक सहकार पॅनल यांच्यात लढत आहे. आज (गुरूवारी) सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. सायंकाळी 4 पर्यंत मतदान समाप्त होणार आहे. दरम्यान, या मतदानाचा निकाल उद्या (शुक्रवारी) जाहीर होणार आहे.

Web Title : MLA Nitesh Rane | sindhudurg district central bank election cooperative department denied voting rights to nitesh rane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

 

Anti Corruption Bureau Pune | पुण्यात वॉरंट रद्द करण्यासाठी 2 हजाराची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात