MLA Nitesh Rane | भाजपला दणका ! नितेश राणेंचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Nitesh Rane | शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) यांना मारहाण प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये भाजपचे आमदार नितेश राणेंचं (MLA Nitesh Rane) नाव घेण्यात आले आहे. यानंतर नितेश राणेंनी अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयात दाखल केला होता. या अर्जावर गेली दोन दिवस सुनावणी सुरू आहे. आज (गुरूवारी) मात्र नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज (Pre-Arrest Bail) जिल्हा सत्र न्यायालयाकडून (District Sessions Court) फेटाळण्यात आला आहे. यामुळे राणेंसह भाजपला (BJP) एक मोठा दणका बसला आहे.

 

विशेष म्हणजे न्यायालयाने याप्रकरणी आज सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील (Sindhudurg District Bank Election) उमेदवार मनीष दळवींचा (Manish Dalvi) अंतरिम जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे आता नितेश राणे यांना कोणत्याही क्षणी अटक (Arrested) होण्याची शक्यता असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झाली आहे.

दरम्यान, मनीष दळवी यांचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे ते मतदानापासून वंचित राहिले.
संतोष परब हल्ल्याप्रकरणातील कटात सहभाग असल्याचे समजताच मनीष दळवी यांनी
अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी अंतरीम जामीनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता.
तसेच नितेश राणे यानी देखील अर्ज सादर केला होता.
या अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयाने (District Sessions Court) निकाल दिला आहे.

 

Web Title :- MLA Nitesh Rane | sindhudurg sessions court rejected bail application of bjp mla nitesh rane in santosh parab attack case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anti Corruption Bureau Kolhapur | 4 हजाराची लाच घेताना पोलीस कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Rashifal 2022 | नवीन वर्ष 2022 मध्ये पहिल्या दिवसापासून कोणत्या 3 राशींवर राहिल शनीचा चांगला ‘प्रभाव’; जाणून घ्या

 

Pune NCP | पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी किशोर कांबळे, कार्याध्यक्षपदी मनोज पाचपुते

 

Post Office Saving Schemes | घरात मुल जन्माला येताच पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, 5 वर्षात मुल होईल ‘लखपती’ !

 

Ratan Tata | रतन टाटांना वाढदिवसाचा केक भरवणारा ‘तो’ तरुण कोण? त्याचा पुण्याशी काय संबंध? जाणून घ्या (व्हिडिओ)

 

Coronavirus in Maharashtra | ‘कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, लोक नियम पाळत नाहीत, महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने’; ठाकरे सरकारमधील या मंत्र्याकडून सूचक संकेत