तर जे काय घडेल, त्याची जबाबदारी आमची नाही : नितेश राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

‘रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ (आरआरपीसीएल) च्या वतीने ग्रीन फील्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्ह आहेत. नाणार प्रकल्पग्रस्तांना समजावण्यासाठी बनवण्यात आलेली मतपरिवर्तन समिती कोकणात आल्यास त्यांनतर जे काय घडेल, त्याची जबाबदारी आमची नाही, आम्ही त्यांना ‘प्रसाद’ देऊ, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिलाय.

नाणार प्रकल्पासाठी सरकारकडून एक समिती बनवण्यात आली आहे. माजी सचिव सुखथनकर यांच्या नेतृत्वाखाली ही समिती लोकांचं मतपरिवर्तन करणार आहे. नाणार प्रकल्पाचं महत्त्व समजावून सांगण्याचं काम ही समिती करणार आहे. या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे राणी ट्विट करून या समितीला जाहीर विरोध दर्शवला आहे.

 

नितेश राणे काय म्हणाले?

“नाणारसाठी कुठल्याही समितीने आमच्या देवगड विजयदुर्ग येथे पाऊल टाकले, तर जे काय घडेल, त्याची जबाबदारी आमची नाही. आम्हाला चर्चा नको, नाणार रद्दच करा, असे जनतेने सांगितले आहे. मग ही समिती कुठलं भजन करायला येणार आहे? आणि ही समिती आलीच, तर मग ‘प्रसाद’ दिल्याशिवाय परत पाठवणार नाही.”, असा इशारा नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे दिला आहे.

यापूर्वीही नितेश राणे यांनी या प्रकल्पाला वेळोवेळी विरोध दर्शवला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प हा कोकणाला उद्ध्वस्त करणारा प्रकल्प आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e94b101e-c099-11e8-bfa0-bd8a1ae65802′]

काय आहे ‘नाणार प्रकल्प’ :

रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या सीमेवर आशियातील सगळ्यात मोठा ऑईल रिफायनरी प्रकल्प म्हणजेच “नाणार प्रकल्प” उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात भारताच्या प्रमुख तीन तेल कंपन्या म्हणजेच भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम एकत्र येणार आहेत. यासाठी सुमारे २.५ ते ३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची सरकारची तयारी आहे. तसंच यामुळे तब्बल १ लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा राज्य सरकारनं केला आहे, तसंच यामुळे भारताला कमी खर्चात इंधन उपलब्ध होवू शकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या आणि एकूणच भारताच्या विकासासाठी नाणार प्रकल्प खूप महत्वाचा मानला जात आहे.

[amazon_link asins=’B0756Z53JN,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e019da9f-c099-11e8-aa11-f77fe3ade63b’]

‘नाणार प्रकल्प’ नाण्याची दुसरी बाजू :

या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात स्थानिकांचा विरोध आहे . नाणार प्रकल्प उभा करण्यासाठी नाणार आणि देवगढ या भागातील एकूण १६ हजार एकर जमीन संपादन करण्याची आवश्यकता आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात आंब्याच्या बागायती आहेत. तसेच येथील आंब्यांना जागतिक बाजारपेठेत चांगलीच मागणी आहे. त्यामुळे या भागात प्रकल्प उभा केल्यास येथील आंब्याच्या बागायतींना नुकसान होईल त्यामुळे शेतकऱ्यांना देखील नुकसान सोसावे लागेल. या शिवाय माधव गाडगीळ समितीने या परिसरातील अनेक गावं ही इको सेन्सेटिव्ह झोन म्हणून घोषित केली आहेत. हा प्रकल्प या गावात नसला तरी या प्रकल्पामुळे नैसर्गिक दृष्टया महत्त्वाच्या प्रदेशावर विपरित परिणाम होणार आहे. या रिफायनरीमुळे या गावांमधील पिण्याच्या पाण्यावरसुद्धा संकट उभं राहिलंय, अशी भीती गावकऱ्यांना वाटायला लागली आहे. हा संपूर्ण परिसर कोकण किनारपट्टीचा परिसर आहे. या भागात मोठ्या प्रमाणात मच्छीमार आहेत. त्यांचा रोजगार या भागावर अवलंबून आहे. हा प्रकल्प झाल्यास त्यांचे विस्थापन करण्यात येईल. ही काही कारणे देत स्थानिक नागरिक या प्रकल्पाला विरोध करत आहेत.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या विघ्नांत आणखी भर