MLA Nitin Deshmukh | ‘एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पत्रावर माझी सही नाही’, आमदार नितीन देशमुख यांचा खळबळजनक दावा

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – विधान परिषदेच्या निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) दुसऱ्याच दिवशी शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली. शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड (Eknath Shinde Revolt) करुन शिवसेना आमदारांच्या (Shivsena MLA) एक गटासह सूरत गाठलं. यामध्ये बाळापूरचे (Balapur) आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांचाही समावेश होता. मात्र आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) गुवाहटीवरुन आता अमरावतीमध्ये परतले. आज त्यांनी पत्रकार परीषद घेऊन खळबजनक दावा केला आहे.

 

शिवसेनेनं काल केलेली अजय चौधरी (Ajay Chaudhary) यांची गटनेते (Group Leader) पदाची निवड अवैध असल्याचं पत्र एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Assembly Vice President Narhari Zirwal) यांना दिले. एकनाथ शिंदे यांच्या पत्रावर शिवसेनेच्या 34 आमदारांच्या सह्या आहेत. पण एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पत्रावर आपली सही नसल्याचा खळबळजनक दावा आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांनी केला आहे.

 

एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पत्रावर तिसऱ्या नंबरवर आमदार नितीन देशमुख यांचं नाव आणि सही आहे. मात्र, ही सही आपली नसल्याचे देशमुख यांनी सांगितले. सही दुसऱ्या कोणी केली आहे का माहिती नाही. पण ही सही माझी नाही. मला कोणतीही सही करण्यास सांगितले नाही. मुळात मी मराठीत सही करत नाही मी इंग्रजीत सही करतो असा दावा आमदार देशमुख यांनी केला आहे.

देशमुख यांनी सांगितले की, सूरतमध्ये मला जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्याठिकाणी इंजेक्शन टोचलं हा आरोप नसून वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.
गुजरातमध्ये हॉटेलवर तीनशे चारशे पोलिसांचा पहारा होता,
गुजरातचे पोलीस (Gujarat Police) राज्याचं कि कोणत्या पक्षाचं काम करतात ही वस्तूस्थिती पहायला मिळाली,
असे सांगत त्यांनी गुजरात पोलीस आणि भाजपवर (BJP) आरोप केले.

 

मी दुपारी तिथून निघालो, माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली होती. तसेच पाऊस पडत होता,
अशा परिस्थितीत मी निघालो, पण माझ्यामागे पोलिसांचा ताफा होता. मला नेण्यासाठी महाराष्ट्रातून गाडी येणार आहे,
अस समजल्यानंतर तेथील स्थानिक पोलिसांनी मला जबरदस्तीने उचलून गाडीत कोंबलं आणि सरकारी रुग्णालयात घेऊन गेले.
तेव्हा माझ्या मनात शंका निर्माण झाली. कुठेतरी आपला घातपात केला जात असल्याचं मला कळलं.
मला सांगितलं की तुम्हाला हार्टअटॅक आला आहे, असे देशमुख यांनी सांगितले.

 

Web Title :- MLA Nitin Deshmukh | mla nitin deshmukh claims that he did not sign the letter given by eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC | 8 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीत मिळवा 50 लाखापेक्षा जास्त रिटर्न, फायद्याचा सौदा आहे LIC चा ‘हा’ प्लान

 

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाच्या 34 आमदारांचं विधानसभा उपाध्यक्षांना पत्र, जाणून घ्या

 

Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदेंचं उत्तर; म्हणाले…