MLA Nitin Deshmukh | रवी राणांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नितीन देशमुखांची जीभ घसरली, म्हणाले – ‘बायकोच्या भरवशावर…’

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) हे एसीबीची नोटीस (ACB Notice) आल्यानंतर चर्चेत आले आहेत. नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांनी पत्रकार परिषद घेऊन रवी राणा (Ravi Rana) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांच्यावर टीकास्त्र सोडलं. यावेळी रवी राणा यांच्यावर टीका करताना नितीन देशमुख यांची जीभ घसरली. त्यांनी अपशब्दाचा वापर केला. तसेच बायकोच्या भरवशावर राजकारण करणारा, असा उल्लेख केला.

आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांना एसीबीची नोटीस आल्यानंतर आमदार रवी राणा यांनी पापाचा घडा भरला अशी टीका केली होती. या टीकेला देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले. राणांच्या विधानावर बोलताना नितीन देशमुख यांची जीभ घसरली.

काय म्हणाले नितीन देशमुख?

ठाकरे गटाचे (Thackeray Group) बाळापूरचे आमदार नितीन देशमुख रवी राणांच्या टीकेला उत्तर देताना म्हणाले, रवी राणा नेमका आहे कुठला? त्याची पैदास कुठली? हेही महाराष्ट्रातील कुणाला माहिती नाहीये. रवी राणा हाXXXX खोर आहे. तो बायकोच्या भरवशावर राजकराण करणारा आहे. मी त्याच्यासारखं बायकोच्या भरवशावर राजकारण करत नाही. मतदार आगामी निवडणुकीत त्याला त्याची जागा दाखवणार. बडनेरा मतदारसंघाची (Badnera Constituency) जबाबदारी पक्षप्रमुखांना मागणार असून त्यातून त्याला धडाही शिकवणार असल्याचे नितीन देशमुख म्हणाले.

सोमय्यांना बंगला मीच घेऊन दिला

भाजप नेते किरीट सोमय्या यांची संपत्ती मीच घेऊन दिलेली आहे.
त्यांचा बंगलाही मीच घेऊन दिल्याचा तिरकस टोला देशमुख यांनी लगावला.
माझी बेहिशेबी मालमत्ता कोणती? ते एसीबीनं स्पष्ट करावं असं आव्हान त्यांनी सरकार आणि एसीबीला दिले आहे.
ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

Web Title :- MLA Nitin Deshmukh | mla nitin deshmukh criticized ravi rana and kirit somaiya akola

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Government Recruitment | नोकरभरतीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्य सरकार समिती स्थापन करणार

Pune Police Combing Operation | पुणे पोलिसांनी केलेल्या ‘कोंबिंग ऑपरेशन’मध्ये 3765 गुन्हेगारांची झाडाझडती ! 90 सराईत गुन्हेगार गजाआड; 145 कोयते, 3 तलवार, 1 पिस्टल जप्त

Pune Crime News | कोयता गँग विरोधात पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, थेट कोयता विक्रेत्यावर छापेमारी; गुन्हे शाखेकडून 105 कोयते जप्त