MLA Nitin Deshmukh | ठाकरे गटाच्या आणखी एका आमदाराला नोटीस, आमदार नितीन देशमुखांना हजर राहण्याचे एसीबीचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे गटातून (Shinde Group) माघार घेतलेले ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती (Anti Corruption Bureau Amravati (ACB) कार्य़ालयातून नोटीस पाठवण्यात आली आहे. अवैध मामलत्तेची चौकशी करण्यासाठी 17 जानेवारी रोजी अनिल देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांना अमरावतीच्या कार्य़ालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी (Rajapur MLA Rajan Salvi), कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक (Kudal Malvan MLA Vaibhav Naik) यांना एसीबीने नोटीस पाठवली आहे.

 

नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) म्हणाले, मालमत्तेबाबत 17 जानेवारी रोजी जबाब नोंदविण्याचे आदेश नोटिशीत दिले आहेत. काही दिवसांपूर्वी भावनाताई गवळी (Bhavna Gawli) यांनी माझ्यावर गुन्हा (FIR) दाखल केला होता. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान (Winter Session) कलम 353 नुसार माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता अमरावती येथून एसीबी कार्यालयाची नोटीस आली असून माझे म्हणणे मी त्यावेळी मांडणार असल्याचे देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.

 

17 तारखेला भूमिका स्पष्ट करेन
तक्रार कोणाची आहे, तक्रारदाराचे नेमकं त्याचं काय म्हणणं आहे? याबाबत कोणतेही स्पष्टीकरण नोटीसमध्ये दिलेले नाही. आमदाराला नोटीस देताना तक्रारदाराचं साधं नाव देखील दिलेले नाही. 17 तारखेला अमरावती येथे पत्रकार परिषद घेऊन मीडियाला याबाबत माझी भूमिका स्पष्ट करेन असे नितीन देशमुख यांनी सांगितले.

वर संपर्क साधा
देशमुख पुढे म्हणाले, आपल्याला एसीबीच्या कार्यालयातून एक फोन आला होता. तुमची एसीबी कार्यालयात तक्रार प्राप्त झालेली आहे. त्यामुळे एकदा वर जाऊन संपर्क साधावा. आता वर जाऊन म्हणजे नेमकं कुणाला भेटावं, हे मला आणि सर्वांनाच कळलेलं आहे. तरीही मी काही संपर्क करणार नाही. मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक आहे आणि राहणार.

 

नोटीसमध्ये काय म्हटले?
उघड चौकशी संबधाने जाबाब देणेकामी उपस्थित राहण्याबाबत नितीन देशमुख यांना एसीबीनं नोटीस (ACB Notice) पाठवली आहे. आपल्याविरुद्ध उघड चौकशी क्रमांक ईऔ/46/अकोला/2022 अन्वये आपल्या संपत्तीची उघड चौकशी लाचलुचपत प्रतिबंध विभाग अमरावती परिक्षेत्रात अमरावती येथे सुरु आहे.

 

सदर उघड चौकशीचे संबधाने आपले बयान नोंदविणे आवश्यक असल्याने बयान देणेकरिता आपण 17 जानेवारी
सकाळी 11 वाजता अपर पोलीस अधीक्षक (Addl SP) कार्यालय लाचलुचपत प्रतिबंध विभाग अमरावती
येथे उपस्थित रहावे… तसेच सोबत दिलेल्या मत्ता दायित्व फर्म क्रमांक एक ते सातची संपूर्ण माहिती भरून द्यावी.

 

Web Title :- MLA Nitin Deshmukh | shiv sena mla nitin deshmukh has received acb notice

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | ‘इन्व्हेस्टमेंट मांगोगे, यूपी-गुजरात को देंगे’, जयंत पाटलांच्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Former MLA Mohan Joshi | कर्नाटक विधानसभा निवडणूक निरीक्षकपदी मोहन जोशी

Anil Deshmukh | काटोल, नरखेड तालुक्यातील जनतेच्या प्रमुख मागणीचे अनिल देशमुखांकडून मुख्यमंत्र्याना पत्र…