MLA Nitin Deshmukh | राज्यातील राजकीय वातावरण तापलं असतानाच शिवसेना आमदाराच्या पत्नीनं केली पोलिसांत तक्रार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) हे सध्या संकटात सापडलं आहे. शिवसेना नेते (Shiv Sena leader) आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (Cabinet Minister Eknath Shinde) हे काही आमदारांसह सूरतमध्ये निघून गेले आहेत. यामुळे हे सरकार संकटात आलंय. राज्यातील राजकारणात वेगाने घडामोडी घडत असताना अकोलामध्ये (Akola) वेगळचं नाट्य रंगलं आहे. अकोल्यातील बाळापूरचे आमदार (Balapur MLA) नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) बेपत्ता असल्याची तक्रार (FIR) त्याच्या पत्नीने पोलिसांत दाखल केली आहे. मंगळवार (दि. 21) पासून नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांचा फोन बंद असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितलं.

 

अकोला जिल्ह्यातील सेनेचे बळापुरचे नॉट रिचेबल आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) हरवल्याची तक्रार त्यांची पत्नी प्रांजली देशमुख (Pranjali Deshmukh) यांनी केली आहे. शहरातील सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात (Civil Line Police Station) त्यांनी मिसिंगची ही तक्रार दाखल केली आहे. रात्रीपासूनच ते संपर्कात नसल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. सोबतच्या लोकांनाही ते कुठे आहेत हे माहित नसल्याची माहिती आहे. आपल्या पतीला लवकर शोधा, अशी विनंती आमदार देशमुख यांच्या पत्नीने पोलिसांकडे (Akola Police) केली आहे. देशमुख यांचा मंगळवारपासून बंद आहे, असं त्यांच्या पत्नीनं सांगितलंय. याबाबत माध्यमांशी अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.

शिवसेना आमदार नितीन देशमुख हे सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतमध्ये असल्याची माहिती आहे. मंगळवारी सकाळी देशमुख यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले होते. पण दुपारी पुन्हा एकदा त्रास होऊ लागल्याने देशमुख यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नितीन देशमुख यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Web Title :- MLA Nitin Deshmukh | shivsena mla nitin deshmukh missing wife filed complain

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा