MLA Praniti Shinde | काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंवर FIR; जाणून घ्या कारण

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – इंधन दरवाढ, गॅसचे वाढलेले दर आणि महागाईच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांनी सहभाग घेतला होता. कोरोना (Corona) काळात बेकायदेशीरपणे विनापरवाना जमाव जमवणे आणि सोशल डिस्टन्सिंग (Social distance) न ठेवता आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. सोलापूर शहरातील सदर बाझार पोलीस ठाण्यात (sadar bazar police station solapur) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महागाई विरोधात (protest against inflation) सोलापूर शहरामध्ये काँग्रेसच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा प्रतिकात्मक पोषाख घातलेल्या तरुणाच्या गळ्यात उद्योजकांचे फोटो अडकवण्यात आले होते. आंदोलनाच्यावेळी आमदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या. आंदोलनावेळी मोठी गर्दी झाली होती. यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले.

आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) , विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे, तिरुपती परकीपंडला, मनोज यलगुलवार, नगरसेवक विनोद भोसले, सचिन गायकवाड, विकी वाघमारे, देविदास गायकवाड यांच्यासह विद्यार्थी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना महामारीच्या काळात नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य यावेळी आंदोलनकर्त्यांनी केले. जाणीवपूर्वक कृत्य करुन पोलिसांच्या कायदेशीर सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आले. तुम्हाला काय करायचे ते करा, आम्ही बोंबाबोंब आंदोलन करणार, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी यावेळी घेतली.

Web Title : MLA Praniti Shinde | FIR against Congress MLA Praniti Shinde; Know the reason

हे देखील वाचा

Mumbai : DRI कडून लक्झरी कार ‘तस्करी’च्या रॅकेटचा केला ‘पर्दाफाश’

Today petrol price | एक दिवसाआड पेट्रोलच्या दरात वाढ !

El-Colacho Festival | ‘इथं’ भररस्त्यात मुलांना झोपवून वरून उडी मारतो व्यक्ती,
धर्माच्या नावावर भयंकर परंपरा सुरू

COVID 19 मधून बरे झाल्यानंतर तुमची मुले ‘या’ आजारांची शिकार तर होत नाही ना? जाणून घ्या लक्षणे

Staff Selection Commission Recruitment | 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी ! 25000 जागा; कॉन्स्टेबल भरतीचं नोटिफिकेशन जारी

Pune News | येरवडा कारागृहाच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देणार – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (PHOTOS)

Porn Star Dahlia Sky | 600 अ‍ॅडल्ट चित्रपटात काम केलेल्या प्रसिद्ध पॉर्न स्टारचा कारमध्ये सापडला मृतदेह, शरीरावर ठिकठिकाणी गोळीबाराचे व्रण