माझ्यावरील आरोप खोटे अन् बिनबुडाचे, हेगडेंच्या आरोपानंतर अखेर रेणू शर्माने सोडलं मौन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी होत आहे. दरम्यान भाजप नेते कृष्णा हेगडे नी मुंबई पोलिसांना दिलेल्या एका पत्रात रेणू शर्मा नावाच्या महिलेवर ब्लॅकमेल करत असल्याचे आरोप केले आहेत. त्यानंतर आता रेणू शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. मुंडे यांनी हे सर्व जाणीवपूर्वक केल्याचे तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मी कोणत्याही हनी ट्रॅपचा भाग नव्हते, असेही तिने यावेळी स्पष्टीकरण दिले आहे. मुंडे यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जात असून समाजात माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

उलटपक्षी कृष्णा हेगडे यांनीच माझ्याशी बोलायला सुरुवात केली होती. ते मला आमदार प्रताप सिंह सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटले होते. त्यांनी माझ्यावर जे काही आरोप लावले आहे. ते खोटे व बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर अनेक गोष्टी समोर येत आहे. रेणू शर्मा नावाची महिला मला 2010 पासून सतत फोन करून आणि मेसेज करून तिच्याशी संबंध ठेवावेत अशी गळ घालत होती. मला माझ्या सूत्राकडून माहिती मिळाली होती की, ती अशा प्रकारे जाळ टाकून त्यात भुलवून ब्लॅकमेल करते आणि पैसे लुबाडते. मी तिच्यापासून दूर राहण्यात यशस्वी ठरलो. तिला एकदाही भेटलो नाही. दोन दिवसांपूर्वी तिने धनंजय मुंडेंवर आरोप केलेले पाहिले आणि मी पोलिसांना ही माहिती देण्यासाठी पुढे आल्याचे हेगडे यांनी म्हटले आहे.