MLA pratap sarnaik letter | शिवसेनेची रोखठोक भूमिका, म्हणाले – ‘पंतप्रधान मोदींशी वाकड नव्हतच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कुठे?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (policenama online) – महाविकास आघाडी सरकारने (mva government) पंतप्रधान नरेंद्र मोदींशी (pm narendra modi) जुळवून घेतलेच आहे. मुळात आमच्यात वाकडे–तिकडे काही नव्हतेच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कुठे? तरीही विनाकारण त्रास असा काही नाहक प्रकार सुरू असेल तर पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणांच्या विनाकारण त्रास प्रकरणावर दाद मागता येईल किंवा सरनाईकांचे पत्र जसेच्या तसे त्यांच्या माहितीसाठी पाठवता येईल, अशी रोखठोक भूमिका शिवसेनेने (shiv sena) आमदार प्रताप सरनाईक (mla pratap sarnaik letter) यांच्या पत्रावर मांडली आहे. MLA pratap sarnaik letter | An editorial on Pratap Sarnaik’s letter and the BJP by Shivsena Samana

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

आमदार प्रताप सरनाईक (MLA pratap sarnaik letter) यांनी पत्र लिहून भाजपसोबत (BJP) जुळवून घेण्याची मागणीच पत्रातून केली होती. या पत्रामुळे राज्यात सेना- भाजप युतीची चर्चा पुन्हा रंगली आहे. यावरून शिवसेनेने (shiv sena) सामनाच्या अग्रलेखातून याबद्दल भूमिका मांडली आहे. एका आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले यावर प्रतिक्रिया द्यावी असे खास काहीच नाही, पण या पत्रामुळे महाराष्ट्रात राजकीय परिवर्तनाची नवी चाहूल लागली असे काहींना वाटत आहे. ते सर्व लोक राजकारणातील कच्चे लिंबू आहेत. सरनाईकांच्या पत्राचा ताजा कलम इतकाच आहे की, महाराष्ट्रात भाजपने सत्ता गमावली या चिडीतून महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे. आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना नाहक त्रास दिला जात आहे. त्यांच्या या संपूर्ण पत्रात विनाकारण त्रास हाच शब्द व त्यामागच्या भावना महत्त्वाच्या आहेत. सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए (NIA) या केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय कामांसाठी वापर होत असल्याची टीका सेनेने केली आहे.

महाविकास आघाडीतील (mva government) तीनही पक्ष सरकार चालवताना एकमेकांचा मान-सन्मान, स्वाभिमान जपत पुढे जात आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने हा प्रयोग स्वीकारला आहे. आता देशपातळीवर याच प्रयोगाची प्रतीक्षा असल्याचे सेनेने म्हटले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (Congress, NCP, Shiv Sena) या तीनही पक्षांना विनाकारण त्रास देण्याचे उपद्व्याप सुरू आहेत. पण सत्तेचा गैरवापर आणि बलप्रयोग हे कायमस्वरूपी नसते. अर्जुनासारखे लढायचे, शिवाजी महाराजांसारखे शत्रूवर चाल करून जायचे की शत्रूशी तह करून मांडलिकी पध्दतीने गुजराण करायची ? असा सवाल करत सेनेने आपल्या आमदारांची कानउघडणी केली.

शिवसेनाप्रमुखांनी स्वाभिमानाने शिवसेनेचे (shiv sena) अस्तित्व टिकवून ठेवले.
म्हणून आजही सामान्यातल्या सामान्य तरुणांना आमदारकी.
खासदारकी आणि मंत्रीपदे भोगता येत आहेत.
कोणत्याही त्रासाची, छळाची, न्याय-अन्यायाची पर्वा न करता लढत राहाणारा शिवसैनिक हेच शिवसेनेचे बळ आहे.
या स्वबळावर कितीही वार करा.
त्या घावातून निघणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून शिवसेना पुनः पुन्हा जन्म घेईल.
असे सेनेने आपल्या लेखात म्हटले आहे.

MLA pratap sarnaik letter | An editorial on Pratap Sarnaik’s letter and the BJP by Shivsena Samana

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तुमच्या Aadhaar Card वर जेंडर चुकीचे आहे का? UIDAI ने जारी केली लिंक; आता घरबसल्या अपडेट करा ‘या’ सोप्या पध्दतीनं, जाणून घ्या

e commerce | तुम्ही करत असाल Online Shopping! तर जाणून घ्या नवीन नियमांबाबत; आता Flash Sale च्या नावावर होणार नाही फसवणूक, जाणून घ्या

रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी