MLA Pratap Sarnaik | ‘एकनाथ शिंदे यांनी मला 900 खोके दिले, पण…’; बाळासाहेबांची शिवसेनेतील आमदार प्रताप सरनाईक यांचा उद्धव ठाकरे गटाला टोला

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – MLA Pratap Sarnaik | महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले. त्यावेळी शिवसेनेचे ४० आमदार शिवसेना सोडून एकनाथ शिंदेंबरोबर गेले आणि त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडले. या पक्ष सोडलेल्या आमदारांनी 50 खोके घेऊन (50 कोटी) उद्धव ठाकरेंना धोका दिला अशी टीका एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबर गेलेल्या इतर आमदार-खासदारांवर होत आहे. याच टीकेचा आधार घेत ठाण्याचे बाळासाहेबांची शिवसेनेतील आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांनी उद्धव ठाकरे गटाला टोला लगावला आहे.

 

आमच्या राजकीय विरोधकांकडून आम्ही 50 खोके घेतल्याचे आरोप होत असले तरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला 900 खोके दिले आहेत. पण, ते मतदार संघातील विकासकामांसाठी दिले आहेत असा टोला त्यांनी लगावला आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले. ते आज ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते. यापुर्वी आम्हाला निधी मागावा लागायचा पण, आता समोरूनच निधी मिळत असल्याचा दावा करत अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरनाईक यांनी टोला लगावला आहे. (MLA Pratap Sarnaik)

 

“राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सक्षम नेतृत्व असून त्यांनी ठाणे महापालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी 1800 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यापैकी 900 कोटीचा निधी हा ओवळा-माजिवाडा मतदार संघातील विकास कामांसाठी वापरला जाईल तर, उर्वरित 900 कोटींचा निधी मतदार संघ वगळून महापालिका क्षेत्रातील उर्वरित भागांमध्ये वापरला जाईल. या निधीमुळे रस्ते, सुशोभिकरण तसेच इतर नागरी कामे होणार आहेत, असे सरनाईक म्हणाले.

अनेक आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या काळात त्यांना त्यांच्या मतदारसंघाच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध होत नव्हता असा आरोप केला होता.
तर सर्व निधी फक्त राष्ट्रवादी काँग्रेसकडे जात होता, त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडी सरकार सोडून
एकनाथ शिंदेंना पाठिंबा देऊन भाजप बरोबर सरकार स्थापन केल्याचे म्हणाले.
पण त्यांच्यावर 50 खोक्यासाठी इमान विकल्याचे आरोप होत आहे.
त्याचा संदर्भ घेत प्रताप सरनाईक यांनी हा टोला लगावला.

 

Web Title :- MLA Pratap Sarnaik | MLA pratap sarnaik taunts uddhav thackeray saying that cm shinde given 1800 crores fund for development thane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

UGC 4 Year Graduation Program | युजीसीचा मोठा निर्णय ! आता 12 वी नंतर डिग्रीसाठी 4 वर्ष लागणार

Social Media Influencer Rohit Bhati | सोशल मीडिया स्टार रोहित भाटीचा भीषण अपघातात मृत्यू

Vinayak Raut | शिंदे सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करतंय; उद्धव ठाकरे शेतकरी संवाद मेळावा घेणार – विनायक राऊत