MLA Pratap Sarnaik | ‘…म्हणून नगरसेवकांचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा, उल्हासनगरातील 18 नगरसेवक शिंदे गटात सामील’ – प्रताप सरनाईक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आमदारांपाठोपाठ आता काही नगरसेवक (Corporator) सुद्धा शिंदे गटात (Shinde Group) सामील होऊ लागले आहेत. नवी मुंबई (Navi Mumbai), कल्याण – डोंबिवली नंतर (Kalyan – Dombivli) आता मिरा भाईंदर महापालिकेचे (Bhayander Municipal Corporation) शिवसेनेच्या सुमारे 18 नगरसेवकांनी शिवसेना (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना समर्थन दिले आहे. सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांनी म्हटले की, आम्ही प्रखर हिंदुत्वाचे विचार घेऊन चाललो आहोत. या मताशी सहमत होऊन नगरसेवक, आमदार, खासदार (MP), कार्यकर्ते येत असतील तर त्यांचे आम्ही स्वागतच करु.

 

18 नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) म्हणाले, मी मीरा भाईंदर मतदारसंघात तीन टर्मपासून आमदार आहे. हे सर्व लोकप्रतिनिधी दोन ते तीन वेळा नगरसेवक झालेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यानंतर मीरा भाईंदर शहराच्या विकासासाठी साडे तीनशे ते चारशे कोटी रुपये दिले आहेत.

सरनाईक पुढे म्हणाले, एवढ्या मोठ्या प्रमाणात एखादा मुख्यमंत्री निधी देत असेल आणि एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा असे घडत असेल,
तर निश्चितपणे मुख्यमंत्र्यांचा सन्मान आणि सत्कार आमच्या सगळ्या नगरसेवकांच्या हस्ते व्हायला हवा, या मताचे आम्ही आहोत.
त्यामुळे या सर्व नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे.

 

सरनाईक म्हणाले, आम्ही प्रखर हिंदुत्वाचे (Hindutva) विचार घेऊन चाललो आहोत.
या मताशी सहमत होऊन नगरसेवक, आमदार, खासदार, कार्यकर्ते येत असतील तर त्यांचे आम्ही स्वागतच करु.
यापूर्वी नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीमधील शिवसेनेचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात शिंदे गटात सहभागी झाले आहेत.
आता पुन्हा मिरा-भाईंदरमधील नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेनेला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.

 

Web Title :- MLA Pratap Sarnaik | ulhasnagar shiv sena corporators join eknath shinde group under leadership of pratap sarnaik

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा