MLA Pravin Darekar | प्रवीण दरेकरांचे भास्कर जाधवांवर टीकास्त्र, म्हणाले – ‘भास्कर’चा ‘उदय’ नाही आता ‘अस्त’ जवळ आलाय

कुडाळ : पोलीसनामा ऑनलाइन – तळ कोकणातील भाजपाची संविधान समर्थन रॅली (BJP Samvidhan Rally) सध्या चर्चेचा विषय झाली आहे. ही संविधान समर्थन रॅली आज कुडाळमधील भाजपा कार्यालय ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशी काढण्यात आली होती. या रॅलीच्या सभेदरम्यान मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर (MLA Pravin Darekar) यांनी शिवसेना नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि शिवसेना आमदार वैभव नाईक (Shivsena MLA Vaibhav Naik) यांच्यावर जोरदार टीका केली. रॅलीला प्रवीण दरेकर (MLA Pravin Darekar) यांच्यासह आमदार प्रसाद लाड (MLA Prasad Lad), भाजपा प्रदेश चिटणीस माजी खासदार नीलेश राणे (Former MP Nilesh Rane), जिल्हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli), माजी आमदार प्रमोद जठार (Former MLA Pramod Jathar) आदी उपस्थित होते.

 

यावेळी प्रवीण दरेकर (MLA Pravin Darekar) म्हणाले, भास्करचा आता सूर्योदय नाही तर सूर्यास्त जवळ आला आहे. वैभव नाईक यांचे वैभव जाऊन भाजपचे वैभव कुडाळ विधानसभेमध्ये निश्चितपणे उदयास येईल. नाईक व जाधव आणीबाणीच्या गोष्टी करतात आणि देशात आणीबाणी लावणार्‍या त्या काँग्रेस (Congress) पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसतात.

 

दरेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) नेतृत्व जनतेने मान्य केले आहे. तर कोकणच्या जनतेने मंत्री नारायण राणेंचे (Narayan Rane) नेतृत्व मानले आहे. त्यामुळे आमच्या नेतृत्वावर वेडं-वाकडं बोलाल तर तुम्हाला जशाच तसे उत्तर दिले जाईल. आम्ही संविधान घेऊन चालतो. डॉ. बाबासाहेबांनी आम्हाला कायद्याचे पालन करायला शिकवले. त्यामुळे संविधानाचा अपमान, लोकशाहीला तुडविणार्‍यांना आम्ही सोडणार नाही. ज्याला ठोकायचा असेल तर ठोकू.

यावेळी निलेश राणे म्हणाले, कुडाळमध्ये 4 दिवसांपूर्वी आमदार वैभव नाईक यांनी अघोषित मोर्चा काढला.
खरेतर चौकशी लावली म्हणून यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी कुडाळात मोर्चा काढण्यात आला.
हे उद्धव ठाकरे सरकार (Uddhav Thackeray Government) नाही, हे शिंदे-फडणवीस यांचे कायद्याचे सरकार आहे.
चिपळूणच्या जाधव यांना एक दिवस तरी आपली ताकद दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

 

तर प्रसाद लाड म्हणाले, भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांचे आयटम गर्ल (Item Girl) आहेत.
तर वैभव नाईक हे चिंधीचोर आहेत, उदय सामंत (Uday Samant) यांच्या पाया पडणारे जाधव यांनी आम्हाला शिकवू नये.
आमचे नेते राणे यांना जेवणावरून उठविणार्‍या उद्धव ठाकरे व भास्कर जाधवांचा बदला घेतल्याशिवाय आपण गप्प बसायचे नाही.

 

Web Title :- MLA Pravin Darekar | bjp leader mla pravin darekar criticizes shivsena leader bhaskar jadhav

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rohit Patil | कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीची मते फुटल्यावर रोहित पाटलांचा संजय पाटलांना प्रश्न

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे उद्यापासून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करणार

Aditya Thackeray | तुमच्या दोघांपैकी जे कोणी खरे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी माझ्या मागणीची दखल घ्या – आदित्य ठाकरे