रेल्वेमधील चोरट्यांचा दोन आमदारांना ‘फटका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रेल्वे प्रवासात नेहमीच छोट्यामोठ्या चोरीच्या घटना घडत असतात. त्याच्या अधिक फटका नेहमी सामान्य जनतेला बसतो. यावेळी मात्र राज्यात पावसाळी अधिवेशन सुरु आहे. राज्यातील दोन आमदारांना या रेल्वेतील चोरट्यांचा फटका बसला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील दोन आमदारांच्या साहित्याची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार कल्याण रेल्वे स्टेशनला घडला आहे. सीएसएमटीच्या लोहमार्ग पोलिसांत आमदारांनी चोरीची तक्रार दाखल केली आहे.

राज्यातील पावसाळी अधिवेशन चालू आहे. त्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार राहुल बोन्द्रे, शिवसेनेचे आमदार संजय रायमूलकर आणि शशिकांत खेडेकर मुंबईला येत होते. त्यावेळी हा सर्व प्रकार घडला.

आमदार बोन्द्रे हे आपल्या पत्नीसह रविवारी मलकापूर येथून विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला येण्यासाठी बसले. सोमवारी सकाळी ६-७ च्या दरम्यान बोन्द्रे कल्याणला उतरले तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या पत्नीच्या पाकीटावर डल्ला मारत पळ काढला. त्याच वेळी चोरट्यांनी बोन्द्रे यांची महत्त्वाची फाईलही पळवली. यावेळी बोन्द्रेच्या पत्नीच्या पाकिटात २६ हजारांची रोकड, तसंच एटीएम कार्डही होते.

शिवसेनेचे आमदार  रायमूलकर आणि खेडेकर हे जालन्याहून देवगिरी एक्स्प्रेसने मुंबईला आले. कल्याणला उतरणार होते. उतरण्यासाठी रायमूलकर सकाळी उठले असता त्यांचा मोबाईल आणि खिशातील १० हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचं त्यांच्या लक्ष्यात आलं. तर सोबत असलेले आमदार खेडेकर यांची चोरट्याने त्यांच्या बॅगेला ब्लेडने कापले असल्याचं समोर आलं. हा संपूर्ण प्रकार कल्याण ते ठाणे स्टेशन दरम्यान घडला.

दरम्यान, हा सगळा प्रकार आमदारांसाठी रेल्वेमध्ये लागलेल्या विशेष बोगीमध्ये झाल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर दोन्ही आमदारांनी याबाबत तक्रार नोंदवली आहे. पोलीस चोरी गेलेल्या सामानाचा तपास करत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त

गर्भनिरोधक गोळ्यांचा होऊ शकतो ‘सेक्स लाईफ’वर परिणाम

रात्रीचे जेवण हलके-फुलके घेतल्यास दिसतील ‘हे’ चांगले परिणाम

तोंडाच्या कॅन्सरपासून संरक्षण करणारे भारतीय उत्पादन ‘स्वर्णसाथी’

‘ही’ ८ लक्षणे आहेत ल्यूकेमियाची, दुर्लक्ष करणे ठरु शकते जीवघेणे