विरोधकांनी ‛कुल द्वेषाचा चष्मा’ काढून पाहिल्यास 1400 कोटींचा विकास दिसेल

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यामध्ये विकास कामे झाली नाही असे म्हणणाऱ्यांनी अगोदर आपल्या डोळ्यावरील कुल द्वेषाचा चष्मा काढावा. त्यानंतर त्यांना दौंड तालुक्यात १४०० कोटींचा विकास झालेला नक्कीच दिसेल, असा टोला आमदार राहुल कुल यांचे जेष्ठ विश्वासू सहकारी बाळासाहेब लाटकर यांनी विरोधकांना लगावला आहे. ते यवत येथे पत्रकारांशी बोलत होते.

बाळासाहेब लाटकर

लाटकर यांनी पुढे बोलताना काल दौंडचे माजी आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खोर येथे विकास झाला नाही आणि जरी विकास झाला असेल तर आमदार राहुल कुल यांनी काही उपकार केले नाही हे त्यांचे कामच आहे असे भाष्य केले होते. या टिकेबाबत त्यांनी उत्तर देताना विरोधक अगोदर म्हणतात विकास झाला नाही, नंतर म्हणतात विकास केला तर काय उपकार केले आहे का हे म्हणणे म्हणजे चिरोधकांच्या बोलात बोल नसून त्यांनी स्वतःच मान्य केले आहे की विकास कामे झालीच आहेत आणि आम्ही सुद्धा म्हणतो की विकास कामे झाली आहेत आणि आम्ही जनतेवर उपकार केले नाहीत तर जनतेने जो विश्वास विद्यमान आमदार राहुल कुल यांच्यावर दाखवला होता त्याला कुल खरे उतरले आहेत असे सांगितले.

खोर येथील विकास कामांबाबत बोलताना एकट्या खोरमध्ये जवळपास १९ कोटींची विकासकामे झाली आहेत. त्याबाबतचा अहवाल घरोघरी पोहोच झालेला आहे. या कामांबाबत जनतेला कुठलाही संशय नाही. विरोधक मात्र यावर मुद्दाम संशय उपस्थित करून स्वतःची स्वार्थाची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत पण जनता आता यांना भुलणार नाही आणि पुन्हा एकदा आमदार राहुल कुल यांच्याच भक्कमपणे पाठीशी उभी राहील असा विश्वास व्यक्त केला.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी