माजी आ. रमेश थोरातांच्या ‛खुटबाव’ गावात आमदार राहुल कुल यांचा 31 कोटी 57 लाखांचा निधी

पुणे (दौंड) : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – दौंडचे माजी आमदार आणि पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या खुटबाव या गावांमध्ये विद्यमान आमदार राहुल कुल यांनी सुमारे ३१ कोटी ५७ लाख ६० हजार रुपयांचा विकास निधी टाकला असून या विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन आज पार पडले. कुल-थोरात हे राजकीय वैर संपूर्ण जिल्ह्याला माहीत असून विद्यमान आमदार राहुल कुल यांनी त्यांचे कट्टर राजकीय वैरी रमेश थोरात यांच्या खुटबावमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर विकास निधी टाकल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
MLA-Rahul-Kul
या विकास निधीमुळे खुटबावला जोडणाऱ्या तिन्ही बाजूच्या मुख्य रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून या रस्त्यांमुळे या परिसरातील दळणवळण सुधारण्यास मोठी मदत होत आहे. आमदार कुल यांनी खुटबाव व परिसरातील शेतीला वरदान ठरणारा बेबी कॅनॉल तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे पाठपुरावा करून सुरु करून घेतला होता. या बेबी कॅनॉलच्या पाण्याचा या परिसरातील फुल शेतीला मोठा फायदा झाला आहे.
MLA-Rahul-Kul
खुटबाव ता. दौंड या ठिकाणी झालेली विकासकामे पुढीलप्रमाणे
१) बेबी कॅनॉल दुरुस्ती – मंजूर रक्कम – १५ कोटी ८१ लक्ष

२) केडगाव ते खुटबाव पिंपळगाव रस्ता – मंजूर रक्कम – ५ कोटी

३) पारगाव गलांडवाडी खुटबाव यवत रस्ता सुधारणा – मंजूर रक्कम – ४ कोटी ५० लक्ष

४) खुटबाव ते केडगाव टोलनाका (शिरूर-सातारा रस्ता) रस्ता सुधारणा – मंजूर रक्कम – १ कोटी ७३ लक्ष २५ हजार

५) पाटेठाण दहिटणे खामगाव कासुर्डी ते ते गाडीमोड लडकतवाडी खुटबाव रस्ता – मंजूर रक्कम – १ कोटी ८४ लक्ष ५० हजार

६) खुटबाव पिंपळगाव उंडवडी रस्ता – मंजूर रक्कम – १ कोटी ३५ लक्ष

७) खुटबाव गाव ते इरिगेशन ऑफिस रस्ता – मंजूर रक्कम – ७३ लक्ष ३३ हजार

८) खुटबाव पिंपळगाव खामगाव नांदूर सहजपूर ते राम-9 रस्ता रस्ता – मंजूर रक्कम -२३ लक्ष ८७ हजार

९) राम-९ खुटबाव देलवडी व खुटबाव निंबाळकरवस्ती धुमळीचामळा केडगाव रस्ता – मंजूर रक्कम – १६ लक्ष ६५ हजार

१०) महादेव मळा अंतर्गत रस्ता – मंजूर रक्कम – १५ लक्ष

११) महादेव मळा सभामंडप – मंजूर रक्कम – ५ लक्ष.
खुटबाव व परिसरातील संपूर्ण विकासकामांच्या निधीची रक्कम ही ३१ कोटी ५७ लक्ष ६० हजार इतकी झाली आहे. या विकासकामांचे उद्घाटन करताना आ. राहुल कुल यांनी तालुक्यातील विकासकामे करताना आपण कुठलाही भेदभाव करत नाही असे मनोगत व्यक्त केले.

आरोग्यविषयक वृत्त –